Home Technology Mobile Apps आता एकाच वेळी पाच उपकरणांवर WhatsApp वापरता येणार

आता एकाच वेळी पाच उपकरणांवर WhatsApp वापरता येणार

whatsapp web

WhatsApp ने त्याच्या सर्व वापरकर्त्यांसाठी बहुप्रतीक्षित मल्टी-डिव्हाइस सपोर्ट म्हणजेच बहू उपकरण वैशिष्ट्य लागू करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत व्हाट्सअप वेब या सुविधेद्वारे मोबाईल फोन वरील व्हाट्सअप खाते डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर पाहता येत होते. परंतु यात मोबाईल फोन शिवाय केवळ एकाच उपकरणावर व्हाट्सअप खाते जोडून पाहता येत होते. आता या नवीन अपडेटमुळे iOS आणि Android या दोन्ही प्रणालींच्या वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये इंटरनेट जोडणी सक्रिय नसतानाही एकाच वेळी एकापेक्षा अधिक डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याची अनुमती मिळेल. मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर गेल्या काही काळापासून बीटा चाचणीत होते.

बहू-उपकरण समर्थन या नवीन वैशिष्ट्यासह वापरकर्ते आता एका वेळी एका फोनसह चार अधिक उपकरणे जोडण्यास सक्षम असतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फोन १४ दिवसांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिल्यास जोडलेली उपकरणे आपोआप विलग होतील. मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरचे तपशील आता WhatsApp च्या FAQ पेजवर अद्ययावत केले गेले आहेत. एकापेक्षा अधिक जोडलेल्या उपकरणांचा वापर करून केल्या जाणारे संदेशवहन एंड-टू-एंड एन्क्रिप्शनने सक्षम असेल व्हॉट्सअ‍ॅपने पुष्टी केली आहे

व्हाट्सएपचे मल्टी-डिव्हाइस फिचर कसे वापरायचे?
मल्टी-डिव्हाइस वैशिष्ट्य वापरण्यासाठी सर्वप्रथम वापरकर्त्यांना WhatsApp ची नवीन आवृत्तीवर अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे. यानंतर जर तुम्ही Android स्मार्टफोन वापरत असाल तर WhatsApp उघडून त्यातील तीन बिंदू मेनूवर टिचकी मारून Linked Devices या पर्यायावर टिचकी मारा. इथे तुम्ही जर याआधी एखादे उपकरण जोडून ठेवले असेल तर त्याचे नाव दिसेल. अजून एक उपकरण जोडण्यासाठी तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वेब ब्राऊझर उघडून web.whatsapp.com टाईप करा. प्रदर्शित झालेल्या पृष्ठावरील QR कोड मोबाईलवरील Link A Device या पर्यायावर टिचकी मारून स्कॅन करा. iOS वापरकर्ते सेटिंग्ज पर्यायाद्वारे थेट लिंक केलेले डिव्हाइस निवडून कनेक्ट करू शकतात. एकापेक्षा अधिक उपकरणांवर व्हाट्सअप वापरण्यासाठी वरील कृती पुन्हा करावी.

ज्या वापरकर्त्याकडे व्हाट्सअप अद्ययावत नसेल अशा वापरकर्त्याशी मोबाईल व्यतिरिक्त अन्य उपकरणांद्वारे संदेशांची देवाण-घेवाण करता येणार नाही. तसेच त्यांना ही सुविधा वापरून कॉल सुद्धा करता येणार नाही. त्यानंतर, तुम्हाला लिंक अ डिव्हाइसवर क्लिक करावे लागेल आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाने किंवा पिन अद्ययावत वापरकर्ते संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी एकापेक्षा अधिक डिव्हाइस वापरू शकतात. तथापि जोडलेल्या केलेल्या उपकरणांवर लाईव्ह लोकेशन पाहणे शक्य नसल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. याबरोबरच ब्रॉडकास्ट सूची तयार करणे आणि पाहणे किंवा लिंक पूर्वावलोकनासह संदेश पाठवणे WhatsApp वेबवर उपलब्ध होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपचा मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आतापर्यंत बीटा म्हणजेच चाचणी अवस्थेत होता तो आता संपल्याचे कंपनीने घोषित केले आहे. याचा अर्थ असा की हे वैशिष्ट्य आता पूर्णपणे विकसित झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने बीटा वैशिष्ट्य सादर केल्यापासून वेब ब्राउझरद्वारे अॅक्सेस करणार्‍या लोकांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती.

Exit mobile version