Home Technology Mobile Apps टेलिग्रामची ५ नवीन वैशिष्ट्ये: चॅट चे भाषांतर, प्रोफाइल फोटो मेकर व बरेच...

टेलिग्रामची ५ नवीन वैशिष्ट्ये: चॅट चे भाषांतर, प्रोफाइल फोटो मेकर व बरेच काही

Telegram new features: message translate

mobile in hand telegram ap

एंड-टू-एंड एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म टेलिग्रामने संदेशांचे भाषांतर, प्रोफाइल पिक्चर मेकर, इमोजी श्रेणी आणि बरेच काही यासह त्याच्या नवीनतम अद्यतनाचा भाग म्हणून आपल्या वापरकर्त्यांसाठी भरपूर नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. तथापि, त्यापैकी काही वैशिष्ट्ये फक्त प्रीमियम सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांपुरते मर्यादित आहेत.

चॅट्सचे भाषांतर: प्रीमियम वापरकर्ते आता त्यांच्या संपूर्ण चॅट्सचे भाषांतर करू शकतील. शीर्षस्थानी असलेल्या भाषांतर बारवर टिचकी मारून संपूर्ण चॅट, समूह आणि चॅनेलचे रिअल-टाइममध्ये भाषांतर करण्यास सक्षम असतील. एकदा का हे वैशिष्ट्य लागू केले की चॅट व समूहातील संदेश आपोआप तुम्ही निवडलेल्या भाषेत अनुवादित होतील. त्याचसोबत सर्व संदेशांचे आपोआप भाषांतर नको असल्यास विशिष्ट संदेश निवडून त्याचा अनुवाद करता येईल.

प्रोफाइल फोटो मेकर: टेलिग्रामचे वापरकर्ते आता “प्रोफाइल फोटो मेकर” हे नवे वैशिष्ट्य वापरून कोणतेही स्टिकर किंवा अॅनिमेटेड इमोजी त्यांचे खाते, समूह किंवा चॅनेलसाठी प्रोफाइल फोटोमध्ये त्वरित रूपांतरित करू शकतील. सर्व टेलिग्राम वापरकर्ते या प्रतिमांसाठी अॅनिमेटेड आणि वैयक्तिक इमोजी वापरू शकतील.

इमोजी वर्गवारी: टेलीग्राम वापरकर्ते चॅट मध्ये वापर करण्यासाठी सध्या दहा लाखाहून अधिक वेगवेगळे स्टिकर्स आणि इमोटिकॉन्समधून निवडू शकतात. म्हणूनच कंपनीने आता “इमोजी कॅटेगरीज” तयार केल्या आहेत ज्यामुळे वापरकर्ते विषयानुसार स्टिकर्स आणि इमोजी यांची क्रमवारी लावू शकतात.

नेटवर्क वापर: मेसेजिंग प्लॅटफॉर्मने “नेटवर्क वापर” वैशिष्ट्याचे अनावरण देखील केले, जे वापरकर्त्यांना त्यांच्या डेटा योजनेनुसार त्यांच्या स्वयं-डाउनलोड सेटिंग्जमध्ये सुधारणा करण्यास सक्षम करते. टेलीग्राम द्वारे वाय-फाय आणि मोबाइलचा किती डेटा वापरला गेला आहे अचूक पाई चार्ट द्वारे पाहू शकता.

इनकमिंग मीडिया ऑटो सेव्ह करा: “ऑटो-सेव्ह इनकमिंग मीडिया” पर्यायासह वापरकर्ते मीडियाचा आकार, प्रकार आणि ते कोणत्या संभाषणातून प्राप्त झाले यानुसार त्यांच्या गॅलरीत स्वयंचलितपणे कधी जतन केले जावे हे निवडू शकतात. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना फक्त त्यांना आवश्यक असलेली माहिती जतन करण्याची सुविधा देते.

नवीन अद्यतनांचा भाग म्हणून ग्रॅन्युलर मीडिया परवानग्या, वार्षिक प्रीमियम सबस्क्रिप्शन, बॉट्ससाठी चॅट सिलेक्शन, ऍपल आयडी आणि गुगल आयडीसह री-लॉग इन, नवीन कस्टम इमोजी आणि नवीन इंटरएक्टिव्ह इमोजी देखील टेलीग्रामने जोडले आहेत.

Exit mobile version