Home Business ५ मिनिटांत बॅटरी चार्ज होणार. StoreDot कंपनीमध्ये ओला इलेक्ट्रिकची गुंतवणूक

५ मिनिटांत बॅटरी चार्ज होणार. StoreDot कंपनीमध्ये ओला इलेक्ट्रिकची गुंतवणूक

ola electric scooter

भारतातील आघाडीची विद्युत वाहन (EV) उत्पादक कंपनी Ola Electric ने इस्राईल स्थित जलद चार्जिंग बॅटरींमध्ये अग्रणी असलेल्या StoreDot कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे ओला ला स्टोअरडॉट कंपनीचे अवघ्या पाच मिनिटांत बॅटरी विद्युत-भारित करणारे XFC तंत्रज्ञान भारतात वापरण्यास मिळेल. कंपनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतात बॅटरी उत्पादन सुरु करणार आहे.

ओला इलेक्ट्रिकने भारत सरकारच्या लिथियम आयन बॅटरीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केला आहे. सध्या ओला इलेक्ट्रिक परदेशी विक्रेत्यांकडून लिथियम-आयन सेल खरेदी करते आणि तमिळनाडूतील तिच्या कारखान्यात बॅटरी पॅक बनवण्यासाठी त्यांना एकत्र करते. बॅटरी पॅक हा विद्युत वाहनांमधील सर्वात महागडा घटक आहे.

StoreDot मधील गुंतवणूक ही ओला इलेक्ट्रिकने योजलेल्या जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी पहिली गुंतवणूक आहे. कारण ती प्रगत सेल केमिस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग तसेच इतर बॅटरी तंत्रज्ञान आणि नवीन ऊर्जा प्रणालींमध्ये मूळ R&D वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

ओला इलेक्ट्रिकने तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यात Ola Futurefactory हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा कारखाना ऊभारला आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ओला च्या विद्युत दुचाकीची नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. दोन दिवसीय विक्री अभियानात कंपनीने सुमारे ११०० कोटी किंमतीच्या दुचाकींची विक्री केली. Ola S१ व S१ Pro या दोन प्रकारच्या दुचाक्या कंपनीने बाजारात सादर केल्या आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहिती नुसार S१ या दुचाकीची किंमत रु. ९९९९९ इतकी असून S१ Pro या दुचाकीसाठी १२९९९९ रुपये मोजावे लागतील. सादर किंमत ही दुकानातील असून प्रत्यक्ष रस्त्यावर आणेपर्यंत यात थोडी वाढ होऊ शकते.

ओला चे संस्थापक आणि CEO भाविश अग्रवाल म्हणाले: “आम्ही मिशन इलेक्ट्रिकसाठी वचनबद्ध आहोत आणि भारतात ईव्हीसाठी संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. ईव्हीचे भविष्य अधिक चांगले आहे, आम्ही बॅटरी तंत्रज्ञानामध्ये आमची गुंतवणूक वाढवत आहोत तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी करत आहोत.”

स्टोअरडॉटचे सीईओ डॉरॉन मायर्सडॉर्फ यांच्या मते येणाऱ्या दहा वर्षांच्या काळात केवळ दोन मिनिटांच्या चार्जमध्ये १०० मैल (१६० कि.मी.) धावू शकेल अशा क्षमतेच्या बॅटरी बाजारात येतील.

StoreDot ने अत्यंत वेगवान चार्जिंग ‘5-मिनिट चार्ज’ EV बॅटरी तंत्रज्ञानाचा पायंडा पाडला आहे आणि दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात उत्पादनाची योजना आखली आहे आणि येत्या 10 वर्षांमध्ये व्यावसायिकीकरणासाठी ‘2-मिनिट चार्ज’ तंत्रज्ञानावर काम करत आहे. त्याचे सिलिकॉन-प्रबळ एनोड तंत्रज्ञान हे पारंपारिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा आहे, आणि ईव्ही चार्जिंगची वेळ तासांपासून फक्त 5 मिनिटांपर्यंत कमी करते.

Exit mobile version