Home News प्रसारित केलेले ट्विट संपादित करता येणार, Edit पर्यायावर काम करत असल्याची Twitter...

प्रसारित केलेले ट्विट संपादित करता येणार, Edit पर्यायावर काम करत असल्याची Twitter ची पुष्टी.

twitter app on phone

गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या अफवा व चर्चांना अखेर विराम देत ट्विटरने ते एडिट बटणावर काम करत असल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. यामुळे ट्विटर वापरकर्त्यांना लवकरच पोस्ट केल्यानंतर त्या ट्विट मध्ये काही बदल करण्याची परवानगी दिली जाईल.

मागच्याच आठवड्यात कंपनीचे नवीन बोर्ड सदस्य व टेस्ला या सुप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी त्यांच्या अनुयायांना ट्विटर वर मतदान घेऊन विचारले होते की त्यांना ट्विटरवर ट्विट संपादन करण्याचा पर्याय हवा आहे का? यावर बऱ्याच लोकांनी संपादन बटणाच्या बघून कौल दिला आहे. मात्र ते कसे काम करेल यावर मात्र मतभिन्नता दिसून आली.

सोशल मीडिया वरील या बलाढ्य कंपनीच्या कम्युनिकेशन टीमने ट्विट केले आहे: “आता प्रत्येकजण विचारत आहे… होय, आम्ही गेल्या वर्षापासून संपादन वैशिष्ट्यावर काम करत आहोत!”

मस्क यांचे नाव न घेता त्यांच्या मतदानाचा संदर्भ देत या ट्विटमध्ये म्हटले आहे की : “नाही, आम्हाला मतदानातून कल्पना मिळालेली नाही 😉,”

“काय काम करेल, काय नाही आणि काय शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही येत्या काही महिन्यांत @TwitterBlue Labs मध्ये या वैशिष्ट्याची चाचणी सुरू करत आहोत.”

https://twitter.com/TwitterComms/status/1511456430024364037

Twitter Blue हा ट्विटरचा एक सदस्यता प्रकार आहे. याच्या सदस्यांना नवे चाचणी फिचर्स इतरांपेक्षा आधी अनुभवण्यास मिळतात.

ट्विटरवर एडिट बटण असावे की नाही याबाबत मस्क यांच्या कौलची ट्विटरचे मुख्य कार्यकारी पराग अग्रवाल यांनी दखल घेऊन “या मतदानाचे परिणाम गंभीर असतील. कृपया काळजीपूर्वक मतदान करा,” असे ट्विट करून एक प्रकारे वापरकर्त्यांना सावध केले आहे. कंपनीचे ग्राहक उत्पादनाचे उपाध्यक्ष जय सुलिव्हन यांनी मंगळवारी एका ट्विट मालिकेत सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून संपादन बटणाची मागणी होत आहे. तथापि कंपनी “सुरक्षित पद्धतीने” हे वैशिष्ट्य कसे तयार करता येईल याचा शोध घेत आहे. काय संपादित केले गेले आहे याबद्दल पारदर्शकता नसेल तर सार्वजनिक संभाषणाच्या अभिलेखामध्ये बदल करण्यासाठी संपादनाचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी काळजीही त्यांनी व्यक्त केली.

एडिट फंक्शन अंतर्गत वापरकर्ते कोणतेही प्रतिसाद, रिट्विट्स किंवा लाइक्स न गमावता ट्विटमधील व्याकरणाच्या किंवा संदर्भाच्या चुका दुरुस्त करू शकतील असा अंदाज आहे.

खरंतर ट्विटर चे माजी मुख्याधिकारी जॅक डोर्सी यांचा या वैशिष्ट्याला विरोध होता २०१८ साली एका चर्चेदरम्यान पारदर्शकतेचे कारण देत कंपनी कदाचित कधीही हे वैशिष्ट्य जोडणार नाही असे म्हटले होते. परंतु प्रतिस्पर्धी सोशल मीडिया मंच फेसबुक आणि इंस्टाग्राम आधीच वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्ट संपादित करण्याची परवानगी देत आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये ९.२% हिस्सा घेतला असल्याचे उघड केल्यानंतर सोमवारी मतदान सुरू केले. मंगळवारी ट्विटरच्या बोर्डावर त्यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. जवळपास ४ दशलक्ष लोकांनी मस्कच्या मतदानात मत दिले आहे, त्यापैकी ७३.५% लोकांनी संपादन पर्यायाच्या बाजूने मत दिले आहे.

मात्र इलॉन मस्क यांची बोर्डावर नियुक्ती होण्यापूर्वीच कंपनी संपादन बटणावर काम करत असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. ट्विटरच्या या नव्या वैशिष्टयावर तुमचे काय मत आहे ते खाली कमेंट करून कळवा.

Exit mobile version