Home Auto मारुती सुझुकी जिमनी शोरूम मध्ये दाखल

मारुती सुझुकी जिमनी शोरूम मध्ये दाखल

Maruti Suzuki starts to display 5door Jimny in Nexa showrooms

Maruti-Suzuki-Jimny-NEXA जिमनी

जानेवारी महिन्यातील ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये पहिली झलक दाखविल्यानंतर बहुचर्चित मारुती सुझुकी जिमनी ही ऑफरोडर गाडी कंपनीच्या भारतभरातील शोरूममध्ये दाखल होत आहे. ही गाडी देशभरातील नेक्सा शोरूम्स मध्ये टप्प्याटप्प्याने केवळ एक ते दोन दिवस प्रदर्शनासाठी ठेवली जाईल. प्रत्यक्ष विक्री आधीच लोकप्रिय झालेल्या या ऑफ-रोडरची ५ दरवाजा आवृत्ती गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. संभाव्य खरेदीदार ही गाडी बाजारात येण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

मारुतीने जिमनी मध्ये तिचे K15B हे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन वापरले असून ते 102hp आणि 130Nm चा टॉर्क निर्माण करते. याचा गिअर बॉक्स 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल.

जिमनीची 5-दरवाजा आवृत्ती कुटुंबांसाठी अधिक सोयीची असेल. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर विंडो यासह अनेक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यात ६ एअर बॅग्ज चा समावेश केलेला आहे. तसेच यामध्ये हिल होल्ड असिस्ट हे वैशिष्ट्य असेल ज्यामुळे चढावावर थांबलेली गाडी मागे येत नाही. ही तिच्या कायनेटिक यलो या अनोख्या रंगासोबत एकूण ६ रंगात उपलब्ध असेल, ज्यात पांढरा, काळा, करडा, लाल व निळा रंग आहे.

फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध
नवीन मारुती सुझुकी जिमनी केवळ 1.5-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल. नवीन जिमनी सुझुकीच्या ऑलग्रिप फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टमसह उपलब्ध असेल. Zeta आणि Alpha या दोन प्रकारांमध्ये नवीन जिमनी सादर केली जाईल

भारतीय बाजारपेठेतील महिंद्राच्या थार आणि फोर्स कंपनीच्या गुरखा या गाड्यांशी जिमनी 5-डोअर स्पर्धा करेल. जाणकारांच्या मते जिमनी ची किंमत रु. १० ते १२ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. यामुळे ऑफ-रोड ड्राइव्ह करणाऱ्या उत्साही लोकांसाठी हा एक आकर्षक पर्याय आहे.

सुझुकीने अद्याप 5-दरवाजा जिमनीच्या बाजारात येण्याची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु येत्या काही महिन्यांत ती सर्व शोरूममध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने आधीच या गाडीचे बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार अंदाजे १८ हजार ग्राहकांनी आतापर्यंत जिमनी आरक्षित करून ठेवली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून मध्ये ही गाडी ग्राहकांच्या हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूचना: वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वैशिष्ट्यांमध्ये तफावत आढळू शकते. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

Exit mobile version