फोनमधील जागा मोकळी करण्याचे ६ उपाय

Files By Google हे अ‍ॅप फोनची साफसफाई करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. शुभ सकाळ, मिम्स, फॉरवर्डेड मेसेज, चित्र, व्हिडीओ याची  वर्गवारी केली जाते. त्यामुळे असे मेसेजेस डिलीट करणे सोपे जाते.

तुमचे गुगल खाते गुगल फोटोज या अ‍ॅपला जोडले की कॅमेऱ्याने काढलेल्या सर्व छायाचित्रांचा बॅकअप आपोआप घेतला जातो. ही छायाचित्रे तुमच्या गुगल खात्यातील जागेमध्ये साठवली जातात.  बॅकअप झाला की फोनमधील फोटो डिलीट करून जागा मोकळी करता येते.

गुगल ड्राइव्ह हे अ‍ॅप फोनमधील पीडीएफ, वर्ड फाईल्स, इत्यादी प्रकारचा डेटा साठवून ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. यात विविध फोल्डर्स तयार करून त्यात वेगवेगळ्या फाईल्स साठवता येतात. त्यामुळे फोनमधील जागा मोकळी होण्यास मदत होते.

व्हिडिओंमुळे आजकाल फोनमधील स्पेस लगेच भरते. युट्युबवर खाजगी स्वरूपातही व्हिडीओ साठवता येतात. ते सार्वजनिक दिसत नाहीत. हे व्हिडीओ मोजक्या लोकांसोबत शेअर करू शकता. युट्युबवरील  व्हिडीओ तुमच्या गुगल खात्याच्या जागेमध्ये मोजले जात नाही.

गुगल प्ले स्टोअर मध्ये Manage टॅब मध्ये तीन रेषांच्या मेनूवर टिचकी मारून sort by least used निवडा. आता तुम्ही कमी वापर असलेली अ‍ॅप पाहू शकता. यातील नको ती अ‍ॅप निवडून डिलीट करून जागा मोकळी करू शकता. तसेच काही अ‍ॅप चा cache डेटा डिलीट करा.

डाउनलोड फोल्डर अनावश्यक फाईल्सचे भांडार असते. महिन्यातून किमान एकदा हे फोल्डर चाळून यातील अनावश्यक फाईल्स हटवा आणि ज्या आवश्यक असतील त्या गुगल ड्राइव्ह वर किंवा अन्य ठिकाणी सेव्ह करा. तुम्ही जर सर्व कॉल साठी रेकॉर्डिंग चालू ठेवले असेल तर या ध्वनी फाईल्स वरचेवर साफ करत जा.