Technologyव्हाट्सअप स्टेटस कुणी पाहायचे ते तुम्ही ठरवा, ५ नवी...

व्हाट्सअप स्टेटस कुणी पाहायचे ते तुम्ही ठरवा, ५ नवी वैशिष्ट्ये.

Whatsapp introduces 5 new features to status updates

-

- Advertisment -spot_img

व्हाट्सअपने आपल्या लोकप्रिय स्टेटस वैशिष्ट्यासाठी नवीन अद्यतने सादर केली आहेत. आता तुमचे स्टेटस कुणी पाहायचे ते तुम्ही ठरवू शकता. यामध्ये तुम्ही सामायिक केलेल्या प्रत्येक स्टेटसची गोपनीयता पद्धत निवडण्याची तुम्हाला परवानगी मिळते.

तसेच नवीन अद्यतनांमध्ये व्हॉईस स्टेटसचे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे, जे वापरकर्त्यांना WhatsApp स्टेटसवर 30 सेकंदांपर्यंतचे आवाजी संदेश रेकॉर्ड आणि शेअर करण्याची परवानगी देते. याबरोबरच अजून ३ नवी वैशिष्ट्ये सादर केली आहेत जी वारंवार स्टेटस ठेवणाऱ्यांना खूपच उपयोगी ठरतील.

व्हाट्सअप स्टेटसची ही पाच नवीन वैशिष्ट्ये (5 new features of Whatsapp Status Update) खालील प्रमाणे आहेत:

खाजगी प्रेक्षक निवडकर्ता (Private Audience Selector): हे वैशिष्ट्य तुम्हाला तुमचे स्टेटस कोण पाहू शकते हे नियंत्रित करण्याची सुविधा देते. तुम्ही प्रत्येक स्टेटससाठी दर्शक निवडू शकता. शेवटची गोपनीयता सेटिंग भविष्यातील अद्यतनांसाठी जतन केली जाईल.

व्हॉइस स्टेटस (Voice Status): व्हाट्सअप आता तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये ३० सेकंदांपर्यंत आवाजी संदेश रेकॉर्ड आणि शेअर करण्याची परवानगी देते. वैयक्तिक घडामोडी अधिक नैसर्गिक आणि सहजपणे सामायिक करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

स्टेटस रिअॅक्शन्स (Status Reactions): या नव्या वैशिष्ट्यामुळे स्टेटस अपडेटला प्रतिसाद देणे सोपे झाले आहे. आणि स्टेटसवर झटपट प्रतिक्रिया देण्यासाठी वर स्वाइप करा आणि आठपैकी एका इमोजीवर टिचकी मारा. सोबतच मजकूर, व्हॉइस मेसेज, स्टिकर्स इत्यादी सध्याच्या मार्गांनी सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता.

स्टेटस प्रोफाईल रिंग (Status Profile Rings): आता स्टेटस प्रोफाइल रिंगचा वापर करून तुमच्या प्रियजनांकडून येणारे स्टेटस अपडेट कधीही चुकवू नका. जेव्हा ते त्यांचे स्टेटस अपडेट करतील तेंव्हा त्यांच्या प्रोफाइल चित्राभोवती रिंग दिसेल. हे वर्तुळ तुमची चॅट सूची, गट सहभागी यादी आणि संपर्क माहितीमध्ये दृश्यमान असेल.

स्टेटसवर लिंक पूर्वावलोकने (Link Previews on Status): यापुढे जेव्हा तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये एखादी लिंक पोस्ट कराल, तेव्हा तुम्हाला त्या दुव्यामधील मजकुराचे चित्र दिसू लागेल. तुम्ही चॅट मेसेज सोबत जेंव्हा लिंक जोडता तेंव्हा जसे त्या दुव्यामधील मजकुराचे चित्र दिसते अगदी तसेच पूर्वावलोकन चित्र स्टेटस्मध्ये सुद्धा दिसेल. यामुळे तुमचे स्टेटस अधिक चांगले दिसते आणि तुमच्या संपर्क यादीतील लोक त्यावर क्लिक करण्यापूर्वी तो कसलं दुवा आहे हे पाहू शकतात.

वरील अद्यतने जागतिक स्तरावर वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने आणली जात आहेत आणि येत्या आठवड्यात ती प्रत्येकासाठी उपलब्ध होतील.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you