NewsWhatsApp कम्युनिटी कशी तयार कराल? काय आहेत नियम व...

WhatsApp कम्युनिटी कशी तयार कराल? काय आहेत नियम व वैशिष्ट्ये?

-

- Advertisment -spot_img

WhatsApp कम्युनिटी कशी तयार कराल? काय आहेत नियम व वैशिष्ट्ये?

व्हाट्सअपने त्यांचे बहुप्रतिक्षित कम्युनिटी (समुदाय) वैशिष्ट्य नुकतेच Android, iOS आणि WhatsApp वेबवर उपलब्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही WhatsApp Community येणार याची वर्दी दिली होती. जर तुम्ही अनेक व्हाट्सअप समूहां (ग्रुप्स) मध्ये प्रशासक असाल तर हे नवे समुदाय (Community) वैशिष्ट्य तुम्हाला नक्कीच सोयीचे आहे. शाळा, कंपन्या, सामाजिक संस्था तसेच गृहसंकुल संस्था यामध्ये वेगवेगळ्या इयत्ता अथवा विभागांचे अनेक समूह बनविलेले असतात. या अनेक समूहांना चालविणाऱ्या व्यक्तींचा वेळ व ऊर्जा तर वाचेलच  पण त्याच बरोबर त्यांच्या अधीन असणाऱ्या सर्व समूहांमध्ये सुसूत्रता व योग्य समन्वय साधला जाईल. 

WhatsApp कम्युनिटी कसे काम करते?

एका व्हाट्सअप समुदायात तुम्ही कमाल ५० समूह (Groups) जोडू शकता. या समुदायात कमाल ५००० सदस्यांचा एक घोषणा समूह (Announcement Group) सुद्धा बनवू शकता. तुम्ही जेंव्हा नवीन कम्युनिटी तयार करता तेंव्हा तुमच्या कम्युनिटी करिता एक अनाउन्समेंट ग्रुप आपोआप तयार होईल. घोषणा समूह ही एक अशी जागा आहे जिथे कम्युनिटीचे ॲडमिन्स घोषणा ग्रुपमधल्या सर्व कम्युनिटी सदस्यांना मेसेजेस पाठवू शकतात. तुमच्या विद्यमान व्हाट्सअप समूहांसाठी तुम्ही नवीन समुदाय तयार करू शकता तसेच या समुदायात नवे समूह बनवू शकता.  

WhatsApp Community कम्युनिटी कशी तयार करावी?

नवा समुदाय बनविण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp उघडून तळाकडील नवीन चॅट च्या चिन्हावर टिचकी मारा. आता तुम्हाला नवीन संभाषण, नवा समूह आणि त्याखाली नवीन कम्युनिटी हे वैशिष्ट्य दिसेल त्यावर टिचकी मारा. आता समुदायाचे नाव व थोडक्यात माहिती लिहा तसेच एक प्रोफाइल फोटो लावा. लक्षात ठेवा समुदायाच्या नावामध्ये कमाल २४ अक्षरे (कॅरेक्टर्स) असू शकतात. तुमचा समुदाय कशाबद्दल आहे हे सदस्यांना सहज कळेल अशा पद्धतीने कम्युनिटीची माहिती लिहा.

आता तुमचे विद्यमान ग्रुप्स जोडण्याकरिता किंवा नवा ग्रुप जोडण्याकरिता पुढे वर टिचकी मारा. तुमच्या समुदायामध्ये समूह (ग्रुप्स) जोडण्याकरिता नवीन समूह तयार करा किंवा विद्यमान समूह जोडा यावर टिचकी मारा. विद्यमान समूह नव्या समुदायात जोडण्यासाठी तुम्ही सध्या ज्या समुहाचे प्रशासक आहात, त्याच समूहांना तुम्ही जोडू शकता. जोडायचे असलेले समूह निवडा, त्यानंतर पुढील (नेक्स्ट) वर टॅप टिचकी मारा. तुमच्या नव्या समुदायात समूह जोडून झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बरोबर खुणेवर टिचकी मारा.

घोषणा समूह (Announcement Group) कसे काम करतो? 

घोषणा समूह हा एक प्रकारे ब्रॉडकास्ट लिस्ट चे काम करतो. समुदायाच्या घोषणा समूहाद्वारे प्रशासक सर्व समुदाय सदस्यांना सामायिक संदेश प्रसारित करू शकतात. केवळ समुदाय प्रशासक (community admins) घोषणा समूहात संदेश पाठवू शकतात. या समूहाचे सदस्य त्यांना हवे असल्यास नोटीफिकेशन निशब्द करू शकतात. घोषणा समूहातील प्रत्येकजण या समूहातील एकूण सहभागींची फक्त संख्या पाहू शकतो, तथापि, केवळ समुदाय प्रशासक घोषणा समूहातील सर्व सहभागी कोण आहेत ते पाहू शकतात. समुदायातील सदस्यांना घोषणा समूहात राहण्याचे बंधन नाही. ते घोषणा समूह सोडूनही समुदायाचे सदस्य म्हणून राहू शकतात. 

समुदायाचा कोणताही सदस्य त्या समुदायाचा भाग असलेले सर्व समूह पाहू शकतात. समुदायातील इतर समूह शोधण्यासाठी आणि त्यात सामील होण्यासाठी, समुदाय माहितीवर जाऊन इतर समूहांची नावं पाहता येतील. समुदायातील समूह बंद अथवा खुले याप्रकारचे असतील. बंद समूहात सामील होण्यासाठी, तुम्हाला संबंधित समुहावर क्लिक करून त्यात सामील होण्याची विनंती पाठवावी लागेल. संबंधित बंद समूहाच्या प्रशासकाने मान्यता दिल्यावर त्या समूहात सामील होता येईल. खुल्या समूहात सामील होण्यासाठी, समूहावर क्लिक करून त्यात सामील होऊ शकता. 

प्रशासक म्हणून, तुम्ही इतर लोकांना सामील होण्यासाठी आमंत्रित करू इच्छित असल्यास, तुम्ही समुदायाची लिंक देखील शेअर करू शकता. आता एका समूहात १०२४ पर्यंत सदस्य असू शकतात.

यासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you