Technologyइस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

ISRO's Space Tourism Module to be Functional by 2030

-

- Advertisment -spot_img

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन (Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे. गगनयान कार्यक्रमाचा एक भाग असणार्‍या या उपक्रमाचे उद्दिष्ट अंतराळ पर्यटकांना पृथ्वीच्या कक्षेबाहेरील वातावरणाचा अनुभव देण्याचे आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी हिंदुस्थान टाइम्स ला दिलेल्या माहितीनुसार या अंतराळ पर्यटन मॉड्यूलची रचना तीन लोकांना सामावून घेण्यासाठी केली जाईल. ज्यात एक प्रशिक्षित अंतराळवीर आणि दोन पर्यटक असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हे मॉड्यूल लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि सर्व आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.

या अंतराळ पर्यटनाचा खर्च प्रति व्यक्ती सुमारे ६ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यात सहभागी पर्यटक स्वत: ला अंतराळवीर म्हणू शकतील, असे सोमनाथ म्हणाले. या योजनेतील प्रवास सब-ऑर्बिटल स्पेस ट्रॅव्हल की ऑर्बिटल स्पेस ट्रॅव्हल असेल हे अजून स्पष्ट नाही. परंतु ६ कोटी किंमतीच्या तिकिटावरून ही सफर सब-ऑर्बिटल स्पेसची असेल अशी शक्यता आहे. सब-ऑर्बिटल ट्रिपमध्ये पर्यटकांना अंतराळाच्या काठावरील भागात १५ मिनिटे फेरी मारून कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाचा काही मिनिटे अनुभव दिला जातो.

या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला श्री. जितेंद्र सिंह, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ, यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, इस्रोने यापूर्वीच उप अंतराळ कक्षा पर्यटनासाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे.

स्पेस टुरिझम प्रकल्पाचा खर्च अद्याप उघड करण्यात आलेला नाही, परंतु इस्रो या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी विविध पर्याय शोधत आहे. मॉड्यूल विकसित करण्यासाठी एजन्सी खाजगी कंपन्यांशी भागीदारी करण्याचा विचार करत आहे.

अंतराळ पर्यटनात इस्रोच्या प्रवेशामुळे देशाच्या पर्यटन उद्योगासाठी नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये अवकाश संग्रहालय उभारणे आणि अवकाश-संकल्पनेवर आधारित सहली आयोजित करणे समाविष्ट आहे.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!
- Advertisement -spot_imgspot_img

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

गुगलला रु.१३३७ कोटींचा दंड, अँड्रॉइड वरील वर्चस्व गमावणार

अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग प्रणाली बाजारपेठेतील वर्चस्वाचा गैरवापर केल्याने गुगलला रु.१३३७ कोटींचा दंड.

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you