TechnologyBharOS: भारताची स्वदेशी संगणक व मोबाईल कार्यप्रणाली

BharOS: भारताची स्वदेशी संगणक व मोबाईल कार्यप्रणाली

-

- Advertisment -spot_img

केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवार २४ जानेवारी रोजी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (IIT) ने विकसित केलेल्या ‘भारोस’ या स्वदेशी (ऑपरेटिंग सिस्टम) कार्यप्रणालीची चाचणी घेतली. या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते.

काय आहे BharOS कार्यप्रणाली?
BharOS ही एक मुक्त-स्रोत कार्यप्रणाली (Open Source Operating System) विकसित करण्यासाठी भारत सरकार-अनुदानित प्रकल्प आहे. स्मार्टफोनमधील परदेशी कार्यप्रणाली वरील अवलंबित्व कमी करणे आणि स्थानिक पातळीवर विकसित तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

BharOS कार्यप्रणाली वापरकर्त्याच्या उपकरणावर स्वतःहून कोणतेही अॅप्स स्थापित करत नाही. वापरकर्ते त्यांच्या आवश्यकतेनुसार इच्छित अॅप्स डाउनलोड करू शकतात. तसेच वापरकर्त्यांना त्यांच्या उपकरणावरील अॅप्सना दिलेल्या परवानग्यांवर अधिक नियंत्रण ठेवता येईल. यात विशिष्ट सुरक्षा आणि गोपनीयता मानकांची पूर्तता केलेल्या अ‍ॅप्सनाच स्थापित करण्याची परवानगी दिली जाते.

BharOS ही प्रणाली Android ओपन सोर्स प्रोजेक्ट (AOSP) वर आधारित आहे. यामुळे ते काहीसे गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमशी मिळतेजुळते आहे. BharOS हे Linux वर आधारित आहे, जे Windows आणि MacOS सारख्या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिमना एक सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देते. ही कार्यप्रणाली नवशिक्या तसेच प्रगत वापरकर्त्यांसाठी वापरण्यास सोपी जावी अशा पद्धतीने तयार केली आहे आणि त्यात भारतीय परिस्थितीच्या संदर्भात वापरण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.

BharOS चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे २० पेक्षा अधिक भारतीय भाषांसाठी ही कार्यप्रणाली सानुकूल केली आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा अवगत नसलेल्या वापरकर्त्यांचा यात प्रामुख्याने विचार केला आहे.

BharOS ऑपरेटिंग सिस्टीमची रचना माहितीची गोपनीयता आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून केली गेली आहे, ज्यामुळे ती सरकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वापरण्यासाठी योग्य आहे. सायबर धोके आणि डेटा उल्लंघनाच्या सध्याच्या युगात ही महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्य व्यक्ती, लहान व्यवसाय ते मोठ्या सरकारी संस्थांपर्यंत विविध प्रकारच्या वापरकर्त्यांना ही प्रणाली एक आदर्श पर्याय उपलब्ध करून देते.

BharOS डेस्कटॉप आणि मोबाईल या दोन्ही उपकरणांवर विनामूल्य डाउनलोड आणि स्थापित केले जाऊ शकते. परंतु सध्या ही कार्यप्रणाली फक्त कठोर गोपनीयता आणि सुरक्षितता आवश्यक असलेल्या संस्थांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. चाचणी वापरकर्त्यांचा अनुभव, सूचना व प्रतिसादानंतर सर्वसामान्य लोकांसाठी याची आवृत्ती उपलब्ध केली जाईल. तसेच ही कार्यप्रणाली केवळ नवीन उपकरणांपुरती मर्यादित असेल आणि जुन्या उपकरणांसाठी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार नाही असा अंदाज आहे.

IIT मद्रास च्या पाठिंब्याने सुरु केलेल्या JandK ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (JandKops) ने विकसित केला आहे. भारत सरकारचा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील डिजिटल दरी दूर करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you