वेब शोधाच्या जगात Google च्या वर्चस्वाला मोठे आव्हान उभे करत मायक्रोसॉफ्टने अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे समर्थित, बिंगच्या नवीन आवृत्तीचे अनावरण केले आहे. मायक्रोसॉफ्टच्या शोध इंजिनच्या या नव्या आवृत्तीमध्ये OpenAI कंपनीच्या ChatGPT तंत्रज्ञानाला अंतर्भूत केले आहे. दोन दिग्गज टेक कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची लढाई सुरु झाली आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी “शर्यत आजपासून सुरू होत आहे. असे घोषित करून स्पर्धेचे संकेत दिले आहे. OpenAI या कंपनीने विकसित केलेले ChatGPT हे वेब ऍप्लिकेशन सर्च इंजिनवरील शोध चौकश्यांना मानवासारखे प्रतिसाद देण्यासाठी Deep Learning चा वापर करते. नडेला यांच्या मते हे तंत्रज्ञान ऑनलाइन शोधण्याच्या आणि सॉफ्टवेअरशी संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणेल. फक्त वेबसाइट्सच्या लिंक्स देण्या पलीकडे Bing आता शोध विनंत्यांना अधिक व्यापक उत्तरे देते. वापरकर्ते त्यांचे शोध अधिक अचूक करण्यासाठी बॉटशी संवाद साधू शकतात. यासोबतच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरंही साम्य व संदर्भ असलेलले अतिरिक्त उत्तरे शोध पृष्ठाच्या उजव्या बाजूला प्रदर्शित केली जातात.
नवीन Bing शोध इंजिन शोध, ब्राउझिंग आणि चॅट चा एकत्र अनुभव देते. हे अधिक संबंधित परिणाम, संपूर्ण उत्तरे आणि जटिल शोधांसाठी सक्षम केले आहे. यात नवा मजकूर तयार करू शकतो तसेच तो तयार करण्यासाठी प्रेरणा देखील मिळू शकते. नवीन Bing माहितीचे सर्व स्त्रोत उद्धृत करते आणि सोबतच संदर्भ दिलेल्या वेब सामग्रीचे दुवे प्रदान करते.
नवीन Bing शोध इंजिन सर्वांसाठी उपलब्ध केले आहे परंतु सध्या याच्या वापरावर मर्यादा ठेवली आहे. मायक्रोसॉफ्टने याची घोषणा केल्याच्या आदल्याच दिवशी गुगलने स्वतःचा बार्ड नावाचा चॅटबॉट घोषित केला होता .
मायक्रोसॉफ्टने सॅन फ्रान्सिस्को स्थित OpenAI या कंपनीमध्ये अब्जावधी-डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे. Microsoft Teams च्या प्रीमियम आवृत्तीमध्ये ChatGPT ची वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. तसेच ChatGPT तंत्रज्ञानापेक्षाही अधिक प्रगत वैशिष्ट्ये मायक्रोसॉफ्टच्या एज वेब ब्राउझरमध्ये देखील एकत्रित केली जातील असे कंपनीने म्हटले आहे.