Learningलिंक्डइनच्या १२ प्रभावी युक्त्या ज्या मिळवून देतील नोकरी व...

लिंक्डइनच्या १२ प्रभावी युक्त्या ज्या मिळवून देतील नोकरी व व्यवसायाच्या मोठ्या संधी

-

- Advertisment -spot_img

समाजमाध्यमांचा गर्दीमध्ये लिंक्डइन हा असा मंच आहे जो अनेकांकडून बरेचदा दुर्लक्षित राहून जातो. व्यावसायिक व सामाजिक नेटवर्किंगसाठी लिंक्डइन हे एकअग्रणी ऑनलाइन माध्यम आहे. तुम्‍ही तुमच्‍या व्यवसायात वा नोकरीच्या कार्यक्षेत्रात नवे संबंध व ओळखी करण्‍यासाठी तसेच आजी व माजी सहकार्‍यांच्या संपर्कात राहण्‍यासाठी याचा प्रभावी वापर करू शकता. वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी लिंक्डइन हा सर्वोत्तम मंच आहे. 

तुम्हाला हव्या असलेल्या नोकरीचा शोध घेण्यासाठी तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी योग्य तो उमेदवार शोधण्यासाठी लिंक्डइन हा एक प्रभावी मंच आहे. याचसोबत तुमच्या उद्योग व कार्यक्षेत्राशी संबंधित घडामोडी जाणून घेण्याचा लिंक्डइन उत्तम स्रोत आहे. २०२१च्या शेवटापर्यंत लिंक्डइनचे २०० पेक्षा जास्त देशांमध्ये ७४० दशलक्षाहून अधिक सदस्य होते, ज्यात फॉर्च्युन 500 कंपन्यांमधील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. खाली दिलेल्या काही युक्त्या वापरून तुम्ही तुम्हाला अपेक्षित असलेली नोकरी वा व्यावसायिक संधी शोधू व मिळवू शकता. 

  1. LinkedIn वर आपले खाते उघडा
    सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात करणे. ही सुरुवात खूपच सोपी आहे. LinkedIn.com ला भेट द्या आणि Sign Up च्या भागात तुमचे पूर्ण नाव आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करून सक्षम पासवर्ड तयार करा. आता लॉगिन केल्यावर तुमच्या प्रोफाईल रकान्यांमध्ये आवश्यक ती माहिती भरून ते छायाचित्रासह अद्ययावत करा. 
  1. प्रोफाइल व पार्श्वभूमीसाठी योग्य छायाचित्राची निवड करा
    असे म्हणतात की पहिली भेट ही विशेष छाप पाडते. लिंक्डइन वरील तुमचे प्रोफाइल चित्र हे अनोळखी लोकांशी तुमचा परिचय करून देणारे पहिले माध्यम आहे. हा एक व्यावसायिक नेटवर्किंग मंच आहे त्यामुळे अन्य समाजमाध्यमांसाठी निवडलेली छायाचित्रे इथे टाकू नका. तुमचा व्यवसाय, हुद्दा, वय व सामाजिक स्थान लक्षात घेऊन छायाचित्राची निवड करा. छायाचित्र शक्य तेव्हढे अलीकडील असावे. चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत असे एखादे चित्र निवडा.  आता याबरोबरच तुम्हाला पार्श्वभूमी चित्र सुद्धा अपलोड करायचे आहे. या चित्राद्वारे तुम्ही तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे दर्शवू शकता. योग्य पार्श्वभूमी चित्र  लिंक्डइन वरील तुमचे प्रोफाइल पृष्ठ लक्ष वेधून घेण्यास आणि लक्षात राहण्यास मदत करते.
  1. तुमच्या प्रोफाइल मधील सर्व तपशील पूर्ण भरा
    तुमचे प्रोफाइल तुमचा वैयक्तिक ब्रँड बनविण्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. लिंक्डइनचे शोध इंजिन पूर्ण भरलेल्या प्रोफाईल्सना शोध परिणामांमध्ये अग्रस्थान देते. जर तुमचे प्रोफाईल पूर्ण भरलेले असेल तर अपूर्ण प्रोफाइलच्या तुलनेत तुम्हाला २० पट अधिक दृश्यमानता मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे तुमचे प्रोफाइल सार्वजनिक मोड वर असणे आवश्यक आहे. वाटल्यास तुम्ही तुमच्या प्रोफाईलची दृश्यमानता फक्त नोंदणीकृत लिंक्डइन वापरकर्त्यांपुरती मर्यादित ठेऊ शकता. सेटिंग्ज मध्ये प्रायव्हसी पर्यायामध्ये हा बदल करता येईल.
  1. प्रोफाईल हेडलाइनमध्ये तुमच्या हुद्द्यापेक्षा अधिक सांगा
    तुमची हेडलाईन म्हणजेच मथळा हा तुमचा हुद्दा असावा असा कोणताही नियम नाही. तुम्ही जे काम करता ते का करता आणि कशामुळे तुम्हाला ते प्रेरणा देते याबद्दल सांगण्यासाठी हेडलाइनचा रकाना वापरा. तसेच तुम्ही कोण आहात, काय करता आणि तुमच्याकडे देण्यासारखे काय आहे हे थोडक्यात लिहा. यासाठी तुमच्याकडे २००० अक्षरांची मर्यादा आहे. तुमच्या मागील कामाचा संदर्भ, शिक्षण आणि किमान चार कौशल्ये किंवा कौशल्याची क्षेत्रे येथे नमूद करा.
  1. तुमच्या प्रोफाईलचा सारांश परिणामकारक करा
    अनेक लोक त्यांचे LinkedIn प्रोफाइल तयार करताना हा रकाना अजूनही रिक्त सोडतात. तुमचा लिंक्डइन सारांश हा तुमची स्वतःची गोष्ट सांगण्याची उत्तम संधी आहे. तुमच्याकडे असलेली कौशल्ये का महत्त्वाची आहेत आणि तुम्ही काम करत असलेल्या लोकांसाठी ती कसा बदल घडवू शकतात याबद्दल लिहा. 
  1. तुमचे नेटवर्क वाढवा
    तुमचे LinkedIn नेटवर्क विस्तारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या प्रोफाइलची लिंक तुमच्या ईमेल स्वाक्षरी सोबत जोडा तसेच तुमच्या ईमेल ऍड्रेस बुकसोबत जोडून ठेवू शकता. यामुळे लिंक्डइन तुमच्या संपर्कातील व्यक्ती जे आधीच लिंक्डइन चे सदस्य आहेत त्यांना तुमच्या प्रोफाईलबद्दल सूचित करते. व्हिजीटिंग कार्ड वर प्रोफाईल लिंक टाकल्याने नेटवर्कचा विस्तार होण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्ही नवीन कनेक्शन बनविता तेव्हा तुम्हाला केवळ त्या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्येच प्रवेश मिळत नाही, तर त्या व्यक्तींच्या स्वतःच्या सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या कनेक्शनमध्येही प्रवेश मिळतो. हे तुमचे “सेकंड-डिग्री कनेक्शन” बनतात. याने नेटवर्किंगच्या संधी व्यापक होतात. 
  1. संभाषण सुरू करा!
    एकदा का तुम्ही LinkedIn वर तुमचे कनेक्शन केले की, त्यावरील मेसेजिंग सुविधा तुम्हाला त्यांच्याशी संभाषण साधण्याची संधी देते. तुमच्या नेटवर्क मधील व्यक्तींना त्यांच्या एखाद्या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन करा. त्यांनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया द्या. जेंव्हा तुम्ही संभाषण सुरु करता तेंव्हा तुम्ही अधिक संबंधित लोकांपर्यंत पोहचता. 
  1. LinkedIn गट वापरा
    सर्व LinkedIn सदस्य कल्पनांवर चर्चा करण्यासाठी आणि उद्योग बातम्या शेअर करण्यासाठी गट निवडून त्यात  सामील होऊ शकतात. तुमचे व्यावसायिक नेटवर्क विकसित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित मोजक्या गटांमध्ये सहभागी व्हा. तुमचे ज्ञान तुमच्या गटातील लोकांसोबत शेअर करा. लिंक्डइन गट नव्या कल्पना मांडण्याचा आणि त्यांना समर्थन मिळविण्याचा एक मौल्यवान स्रोत आहे.
  1. चांगले लेख व पोस्ट लिहा
    तुमच्या व्यावसायिक अनुभवाचा लाभ इतरांना होऊ द्या. लिंक्डइन तुम्हाला दीर्घ लेख प्रकाशित करण्याची परवानगी देते. तुम्ही लिहिलेले लेख तुमच्या प्रोफाइलवर दिसतात. ते इतर वापरकर्त्यांद्वारे सामायिक केले जाऊ शकतात तसेच शोध इंजिन परिणामांमध्ये देखील दिसू शकतात. तुमच्या पोस्टमध्ये हॅशटॅग जोडल्याने तुमची सामग्री अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. स्लाइडशेअर हे लिंक्डइन चे एक भावंडं आहे ज्यावर तम्ही सादरीकरणे आणि इन्फोग्राफिक्स पोस्ट करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकता. 
  1. शिफारशी द्या आणि प्राप्त करा
    तुमच्या नेटवर्क मधील व्यक्तींसाठी तुम्ही शिफारस लिहू शकता. लिंक्डइन च्या recommendation या फिचरचा वापर करून तुमच्या आजी माजी सहकाऱ्यांसाठी “शिफारशी” लिहू शकतात ज्या त्यांच्या प्रोफाईलवर प्रदर्शित होतात. तसेच त्यांच्या प्रोफाईलवरील नमूद कौशल्यांना तुम्ही endorsed म्हणजेच समर्थन देऊ शकता.  तुमचे सहकारी सुद्धा या बदल्यात तुमच्या कौशल्यांना समर्थन देऊन तुमची शिफारस करू शकतात. 
  1. नोकरीच्या नवीन संधी शोधा
    तुम्ही नोकरी शोधण्यासाठी LinkedIn वापरू शकता. हल्ली बऱ्याच मोठ्या कंपन्या फक्त LinkedIn वरच नोकरीच्या संधी प्रकाशित करतात. या माध्यमातून त्यांना उमेदवारांबद्दल अधिक जाणून घेता येते. त्याचप्रमाणे अनेक उमेदवार LinkedIn चा वापर आपल्या संभाव्य कंपनीबद्दल व तेथील लोकांबद्दल माहिती मिळविण्यासाठी करतात. प्रीमियम खाते तुम्हाला तुमची प्राधान्ये आणि कौशल्य यांच्याशी जुळणार्‍या नोकरीच्या संधी अधिक कार्यक्षमतेने शोधण्याची सुविधा देते. 
  1. LinkedIn वर व्यावसायिक शिष्टाचाराचे पालन करा
    LinkedIn वरील यश चांगली प्रतिष्ठा विकसित करणे आणि ती कायम राखणे यावर अवलंबून असते. अफवा किंवा गप्पाटप्पा पसरवणे टाळा. कारण तुमच्या पोस्ट कोण कधी वाचेल हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हे सर्वोत्कृष्ट धोरण आहे.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you