Purchaseनॉन-इनव्हर्टर की इनव्हर्टर एसी खरेदी करावा? फरक लक्षात घ्या

नॉन-इनव्हर्टर की इनव्हर्टर एसी खरेदी करावा? फरक लक्षात घ्या

Inverter vs non inverter ac: differences and benefits

-

- Advertisment -spot_img

आजच्या काळात वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसी ही उन्हाळ्याच्या महिन्यांत एक सामान्य गरज बनली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विविध प्रकारचे एअर कंडिशनर्स बाजारात आले आहेत. हे एसी मुख्यतः इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर या दोन प्रकारात येतात. या लेखामध्ये, आम्ही तुम्हाला दोन्ही प्रकारच्या AC मधील मुख्य फरक आणि फायदे व तोटे सांगू.

नॉन-इन्व्हर्टर एसी म्हणजे काय?

नॉन-इनव्हर्टर एसी मध्ये खोलीला थंड करण्यासाठी निश्चित वेग असलेला कॉम्प्रेसर वापरला जातो. नॉन-इनव्हर्टर एसीचा कंप्रेसर एकतर पूर्ण वेगाने चालतो किंवा पूर्णपणे थांबतो. जेव्हा खोलीचे तापमान इच्छित स्तरावर पोहोचते तेव्हा कंप्रेसर काम करायचे थांबतो आणि थोड्या वेळाने जेव्हा तापमान पुन्हा वाढते तेव्हा तो पुन्हा सुरू होतो.

इन्व्हर्टर एसी म्हणजे काय?

इन्व्हर्टर एसी मध्ये इलेक्ट्रिक व्होल्टेज, वीज प्रवाह आणि त्याचा दाब नियंत्रित करण्याचे तंत्रज्ञान असते. यात खोलीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी बदलता वेग असलेला कॉम्प्रेसर वापरला जातो. इन्व्हर्टर एसी चालू असताना त्याचा कंप्रेसर कधीच बंद होत नाही. खोलीच्या तापमानानुसार कंप्रेसरचा वेग समायोजित केला जातो.

इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर एसी मधील मुख्य फरक:

ऊर्जा कार्यक्षमता: इन्व्हर्टर एसी नॉन-इन्व्हर्टर एसीपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम असतात. इन्व्हर्टर एसीचा कंप्रेसर खोलीच्या तापमानानुसार त्याचा वेग समायोजित करतो. नॉन-इन्व्हर्टर एसी चा कंप्रेसर वारंवार चालू बंद होत असल्यामुळे जास्त ऊर्जा वापरतो. एखादा 1.5-टन क्षमतेचा इन्व्हर्टर एसी आवश्यकतेनुसार 0.3-टन ते 1.5 टन क्षमतेने काम करू शकतो. परंतु 1.5-टन क्षमतेचा नॉन-इनव्हर्टर एसी नेहमी 1.5-टन क्षमतेनेच चालतो.

तापमान नियंत्रण: तापमान नियंत्रण करण्यात इन्व्हर्टर एसी हा नॉन-इन्व्हर्टर एसीपेक्षा अधिक अचूक असतो. इन्व्हर्टर एसीचा कंप्रेसर सतत चालू राहत असल्यामुळे खोलीच्या तापमानानुसार त्याचा वेग समायोजित करतो त्यामुळे तो अधिक स्थिर तापमान राखू शकतो. नॉन-इन्व्हर्टर एसी चा कंप्रेसर चालू बंद होत असल्याने खोलीच्या तापमानात चढ उतार होत असतो.

आवाज पातळी: कमी आवाज करणारा एसी हवा असल्यास इन्व्हर्टर एसी ची निवड करू शकता. त्याचा कंप्रेसर नियंत्रित वेगाने चालतो त्यामुळे कमी आवाज करतो. याउलट नॉन-इनव्हर्टर एसी जास्त आवाज करणारे असतात. विशेषत: जेव्हा कंप्रेसर सुरू होतो आणि वारंवार थांबतो.

किंमत: इन्व्हर्टर एसी हे नॉन-इन्व्हर्टर एसीपेक्षा जास्त महाग येतात. तर कमी बजेट असलेल्यांसाठी नॉन-इन्व्हर्टर एसी फायदेशीर ठरू शकतात.

दुरुस्ती: इन्व्हर्टर एसी खराब झाल्यास त्याचा दुरुस्ती खर्च नॉन-इनव्हर्टर एसीपेक्षा थोडा अधिक येऊ शकतो. नॉन-इन्व्हर्टर एसीची दुरुस्ती तुलनेने कमी खर्चिक असते

वीज बिल : इन्व्हर्टर एसी अधिक ऊर्जा-कार्यक्षम असल्याने विजेच्या बिलात फारशी वाढ होत नाही. नॉन-इन्व्हर्टर एसी च्या वापराने वीज बिलात मोठी वाढ दिसून येते.

सूचना: वरील माहिती सर्वसाधारण स्वरूपाची असून विविध कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये किंमत व वैशिष्ट्यानुसार फरक असू शकतो. खरेदी करताना संबंधित वस्तू अथवा सेवेचे माहितीपत्रक तपासून घ्या.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you