Learningमेटाव्हर्सचा भुलभुलैय्या : आभासी जगाची नवी ओळख

मेटाव्हर्सचा भुलभुलैय्या : आभासी जगाची नवी ओळख

-

- Advertisment -spot_img

२८ ऑक्टोबर २०२१ रोजी आघाडीची समाजमाध्यम कंपनी फेसबुक ने स्वतःचे नाव बदलून मेटा असे नवे नाव धारण केले. लक्षात घ्या, फेसबुक या समाजमाध्यम मंचाचे नाव तेच राहिले आहे पण त्याची मालक कंपनी जी त्याच नावाने ओळखली जायची तिचे नाव बदलून मेटा असे केले गेले. त्याच वेळी मार्क झुकेरबर्ग जे फेसबुक चे संस्थापक आहेत त्यांनी त्यांची कंपनी आभासी क्षेत्रात आक्रमकपणे मार्गक्रमण करणार याचे संकेत दिले. त्या दिवसापासून Metaverse हा एक उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी मेटाव्हर्स ही संकल्पना अस्तित्वात आली असली तरीही झुकेरबर्ग यांच्या घोषणेनंतर मेटाव्हर्स अचानक ट्रेंडिंग विषय बनला आहे. 

मेटाव्हर्सची पार्श्वभूमी
“मेटाव्हर्स” हा शब्द “मेटा” आणि “व्हर्स” या दोन शब्दांचा मिळून बनला आहे. “मेटा” हा मूळचा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ “पलीकडे” असा आहे, तर “व्हर्स” हा शब्द “विश्व” या शब्दापासून बनला आहे आहे. उदा. युनिव्हर्स. अमेरिकन लेखक नील स्टीफनसन यांनी १९९२ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या स्नो क्रॅश या विज्ञान संकल्पनेवर आधारित कादंबरीमध्ये मेटाव्हर्स या शब्दाचा प्रथम वापर केला होता. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी सुद्धा २०१८ साली अशाच आभासी जगाच्या संकल्पनेवर  रेडी प्लेयर वन नावाचा चित्रपट बनविला होता, जो याच नावाच्या अर्नेस्ट क्लाइन यांच्या २०११ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीवर आधारित होता. मेटाव्हर्स हे एक असे आभासी वास्तव आहे ज्यामध्ये लोक वास्तविक जीवनात जे काही करतात ते या आभासी जगात करू शकतील. 

तसं पाहिलं तर इंटरनेट सुद्धा एक प्रकारचं आभासी विश्वच आहे. फक्त हे विश्व द्विमितीय म्हणजेच टूडी (2D) आहे. फार नाही पण अगदी ३० वर्षांपूर्वी जेंव्हा इंटरनेटचा एवढा प्रसार नव्हता तेंव्हा कुणी कल्पना तरी केली होती का की शेकडो मैल लांब असलेल्या आपल्या मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईकांशी एक दिवस आपण सहजपणे व्हिडीओ कॉल करून गप्पा मारू शकू? मेटाव्हर्स हे या व्हिडीओ कॉलची फार पुढारलेली आवृत्ती असेल ज्यात तुम्ही व्हिडिओच्या आत शिरून एकमेकांच्या घरी आभासी पद्धतीने हजर राहू शकता. 

आता हे आभासी जग कसे असेल याची कल्पना करूया. 
मेटाव्हर्स बनविण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे ते आज प्रत्यक्षात उपलब्ध आहे. ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हो, ही प्रतिसृष्टी बनविण्यासाठीचे तंत्रज्ञान आपल्यातल्या बऱ्याच जणांनी वापरले सुद्धा आहे. खरं नाही वाटत? चला तर मग पाहुयात काय आहे हे तंत्रज्ञान!

व्हर्चुअल रिऍलिटी नावाचे तंत्रज्ञान आहे त्याचा आज व्हिडीओ गेम्समध्ये बऱ्यापैकी वापर होतोय. VR हेडसेट डोळ्यावर लावून तुम्ही या मायावी जगात प्रवेश करू शकता. काही मोठ्या अम्युजमेंट पार्क मध्ये काही रोलर कोस्टर राईड वर याचा अनुभव घेता येतो. डोळ्यावर VR हेडसेट लावून ही राईड जेंव्हा सुरु होते तेंव्हा थोड्या वेळासाठी तुम्ही आजूबाजूचे जग विसरून वेगवेगळ्या थरारक व रोमांचक गोष्टींना सामोरे जाता. 

अग्युमेंटेड रिऍलिटी हे अजून एक तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर मेटाव्हर्स मध्ये केला जाईल. जगभर गाजलेला आणि टीकेचा विषय झालेला पोकेमॉन गो हा गेम अग्युमेंटेड रिऍलिटी या तंत्रज्ञानाची एक झलक होती. यात प्रत्यक्ष जगात आभासी प्रतिमा मिसळल्या जातात. जसे तुमच्या आजूबाजूला पोकेमॉन लपून बसलेले तुम्हाला पाहता येत होते. 

या आभासी जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. एखाद्या गोष्टीचा खरेपणा ताडण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान उपयोगास येतं. एनएफटी म्हणजेच नॉन फंजीबल टोकन या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध आभासी प्रतिमा किंवा वस्तू तयार करून त्या विकता किंवा विकत घेता येतात. आभासी वस्तूंचे विनिमय म्हणजेच व्यवहार करण्यासाठी क्रिप्टो करन्सी म्हणजेच आभासी चलन अस्तित्वात आहे. बिटकॉइन ही एक लोकप्रिय क्रिप्टो करन्सी आहे, ज्याद्वारे रोज अब्जावधी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केले जातात. भारतात अजून तरी याला अधिकृत चलन म्हणून मान्यता नाही. 

वरील सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेटाव्हर्सचे आभासी विश्व आकारास येईल. हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी ५जी सारख्या अतिवेगवान तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. थोड्यावेळासाठी विचार करा की झूम किंवा गुगल मीट सारख्या ऍप्लिकेशनवर एक व्हिडीओ कॉन्फेरंस कॉल आहे. तुम्ही VR हेडसेट डोळ्यावर लावून यात सामील होता. आता VR व AR तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही केवळ दर्शक म्हणून न राहता थेट यात सामील होऊन अगदी एकमेकांसमोर बसल्याप्रमाणे बोलत आहात. 

२००३ साली लिन्डेन लॅब या अमेरिकन टेक कंपनीने सेकंड लाइफ नावाची एक वेबसाईट (ऍप्लिकेशन) लॉन्च केले. तांत्रिकदृष्ट्या मेटाव्हर्सचे बीज पेरण्याचे श्रेय सेकंड लाइफला देता येईल. सेकंड लाइफ त्याच्या वापरकर्त्यांना त्यांचे स्वतःचे 3D व्हर्च्युअल अवतार तयार करू देऊन वास्तविक जगासारख्या गोष्टी सेकंड लाइफ वर करण्याची सुविधा देतं. सेकंड लाइफचे वापरकर्ते इतर वापरकर्त्यांशी संवाद साधू शकतात आणि त्यांच्या आभासी ओळखीद्वारे संबंध निर्माण करू शकतात. ते संगीत मैफिलींना उपस्थित राहू शकतात आणि स्वतःला व्यक्त करू शकतात.  सेकंड लाइफ मध्ये शैक्षणिक संस्था आणि अगदी दूतावासही आहेत. २००७  मध्ये, मालदीव हा सेकंड लाइफमध्ये आभासी दूतावास उघडणारा पहिला देश बनला.

डिसेंट्रल लॅण्ड हे असेच वेगाने विकसित होणारे मेटाव्हर्स आहे. काही दिवसांपूर्वी, एका कंपनीने या संकेतस्थळावर २.४३ दशलक्ष डॉलर्सला (आभासी) जमीन खरेदी केली. व्हर्च्युअल रिअल इस्टेटसाठी आतापर्यंत मोजण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम मानली जाते.

AR आणि VR  आधारित ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून आपण मेटाव्हर्स च्या विश्वात फक्त पाऊलच ठेवलं नाही तर तिथे बऱ्यापैकी स्थिरावलो सुद्धा आहे. फॉर्च्यून बिझनेस इनसाइट्सच्या मते, जागतिक आभासी गेमिंग मार्केट २०२८ शाळांपर्यंत USD 53.44 अब्ज पर्यंत वाढू शकते.

मेटाव्हर्सचे भविष्य काय आहे?
येत्या काळात मेटाव्हर्स इंटरनेटसारखे वास्तविक आणि सामान्य होईल. परंतु त्याला एका विशिष्ट टप्प्यावर जाण्यासाठी एक दशक किंवा त्याहून अधिक वेळ लागेल. मेटाव्हर्स हे काही फेसबुक, मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल सारख्या एका किंवा मोजक्या कंपन्यांद्वारे तयार होणार नाही, तर त्याचा विकास जगभरातील लाखो लोक, संस्था व छोट्या मोठ्या कंपन्या करतील. मनोरंजनाबरोबरच व्यावसायिक व शैक्षणिक वापरासाठी मेटाव्हर्स एक उत्तम मंच म्हणून उपयोगास येऊ शकतो. मेटाव्हर्स सतत विकसित होत असल्यामुळे, आज ज्याप्रकारे त्याची कल्पना केली जात आहे त्यापेक्षा ते प्रत्यक्षात येईपर्यंत अधिक भव्य आणि गतिमान होण्याची शक्यता आहे.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you