Home Business गायीच्या शेणापासून CNG बनविणार, मारुती सुझुकीचा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत करार.

गायीच्या शेणापासून CNG बनविणार, मारुती सुझुकीचा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत करार.

Maruti Suzuki to produce CNG from cow dung

fuel dispenser

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन ने (Suzuki Motor Corporation) त्यांच्या CNG गाड्यांनामध्ये इंधन म्हणून शेणापासून तयार सीएनजी चा वापर करण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी आणि आशियातील सर्वात मोठी दुग्ध उत्पादक संस्था नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने २०३० सालापर्यंतचे वृद्धी धोरण जाहीर करताना नुकतीच याची घोषणा केली.

कंपनीने २०३० च्या वाढीच्या धोरणात म्हटले आहे की त्यांनी जपान मधील फुजिसन असागिरी बायोमास या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी शेणापासून बायोगॅस द्वारे ऊर्जा निर्माण करते. “आम्ही वाहनांची वाढती विक्री आणि त्यातून होणारे कार्बनचे एकूण उत्सर्जन यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करू” असे सुझुकी तर्फे सांगण्यात आले. या प्रयत्नांचा भाग म्हणून सुझुकीने शेणापासून मिळणाऱ्या बायोगॅसवर वाहनांना ऊर्जा पुरविण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा बायोगॅस सुझुकीच्या सीएनजी मॉडेल्ससाठी वापरला जाऊ शकतो. भारतातील सीएनजी कार बाजारपेठेत मारुती सुझुकीचा अंदाजे ७०  टक्के वाटा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या आधी गुजरात मधील बनास डेअरी ने २०२० मध्ये पहिला Bio CNG पंप सुरु केला. डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांकडूनच शेण खरेदी केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते. शेणापासून जो बायोगॅस तयार होतो त्याला शुद्ध करून CNG बनवला जातो. सध्या छोट्या प्रमाणात हा प्रयोग चालू असल्याने निर्माण होणार गॅस उत्पादन संयंत्रापासून ५० मीटर अंतरावर उभारलेल्या पंपा द्वारे वाहनांमध्ये भरला जातो.

सध्या विजेवर चालणाऱ्या वाहनांना मागणी येत असली तरी त्यातील बॅटरी विद्युत भारित होण्यासाठी लागणार वेळ ही मोठी समस्या आहे. तसेच येत्या काळात हा वेळ जरी कमी झाला तरी विजेची वाढती मागणी व चढते दर कायम राहतील. त्यामुळे भारतातील गोधनाची उपलब्धता पाहता हरित सीएनजी इंधनाचा एक चांगला पर्याय म्हणून विकसित होऊ शकतो.

Exit mobile version