new twitter logo doge meme

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्कने मंगळवारी ट्विटरचा आयकॉनिक ब्लू बर्ड लोगो बदलून त्याऐवजी (New Twitter Logo) शिबा इनू डोज या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. Doge meme आता वेब आवृत्तीसाठी Twitter फीड होमस्क्रीनच्या वरील बाजूस डाव्या कोपऱ्यात दिसते. इलॉन मस्क यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये $44 बिलियनमध्ये ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकत घेतल्यापासून त्यात अनेक नवीनतम बदल केले आहेत.

Dogecoin चे समर्थक म्हणून, Twitter च्या लोगोवर ‘Doge’ meme स्थापित करण्याच्या मस्क यांच्या कृतीमुळे ट्विटरवर टिप्पण्यांचा भडका उडाला. बरेच वापरकर्ते विचारत होते की लोगो का बदलला गेला आहे. मस्क यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या विनोदी शैलीत ‘डोज मीम’ असलेले दोन ट्विट पोस्ट करत त्यांच्या कृती वर प्रतिक्रिया दिली आहे.

इलॉन मस्क यांच्या मालकीच्या विजेवरील वाहन बनविणाऱ्या सुप्रसिद्ध टेस्ला या कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये ते व्यापारासाठी Dogecoin स्वीकारणार असल्याची घोषणा केल्यापासून या क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यात वाढ झाली आहे. मस्क यांची दुसरी कंपनी स्पेसएक्स सुद्धा डोजकॉइन स्वीकारेल. मस्क यांच्या या कृतीमुळे सदर क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यात जवळपास ३०% ने वाढ झाली आहे. CoinMarketCap.com या संकेतस्थळाच्या दाव्यानुसार Dogecoin ही क्रिप्टोकरन्सी आता $१३ अब्ज पेक्षा जास्त बाजार मुलासह सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सीच्या यादीत आठव्या स्थानी आहे.

Dogecoin ही एक क्रिप्टोकरन्सी आहे जी २०१३ मध्ये दोन सॉफ्टवेअर अभियंते, बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी शिबा इनू कुत्र्याच्या लोकप्रिय “डोज” या इंटरनेट मीमवर आधारित विनोद म्हणून तयार केली होती. त्या वेळी प्रबळ क्रिप्टोकरन्सी असलेल्या Bitcoin साठी Dogecoin हा एक मजेदार आणि हलकासा पर्याय असावा असा निर्मात्यांचा हेतू होता.

विनोद म्हणून जरी त्याची निर्मिती झाली असली तरी Dogecoin ने बरेच समर्थक मिळवले आणि तेव्हापासून ती एक गंभीर क्रिप्टोकरन्सी बनली आहे. तिचा व्यापार विविध एक्सचेंजेसवर केला जातो. त्याच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे त्याची किंमत अन्य क्रिप्टोकरन्सीपेक्षा खूपच कमी आहे.

अलिकडच्या वर्षांत, इलॉन मस्क सारख्या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या समर्थनामुळे डोजकॉइनने मुख्य प्रवाहात लक्ष वेधले आहे. मस्क यांनी अनेक प्रसंगी या क्रिप्टोकरन्सीबद्दल ट्विट केले आहे. डिजिटल फायनान्सच्या जगात ही एक लोकप्रिय आणि अनेकदा चर्चेत असलेली क्रिप्टोकरन्सी आहे.

इलॉन मस्क यांना याआधीच $२५८ बिलियन खटल्याचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी डोजकॉइनला समर्थन देण्यासाठी पिरॅमिड योजना चालवली. ट्विटरच्या सीईओच्या कायदेशीर टीमने लोगो (New Twitter Logo) बदलण्याच्या काही दिवस आधी कोर्टाला डॉगेकॉइन खटला फेटाळण्याची विनंती केली होती.

अलीकडेच मास्क यांनी यापूर्वी ट्विट केले होते की एप्रिलपासून, For you या फीड मध्ये केवळ सशुल्क खात्यांवरील सामग्रीची शिफारस करेल. एकूणच ट्विटर खरेदी करण्यासाठी केलेली गुंतवणूक वसूल करण्यासाठी मस्क नवनवीन युक्त्या वापरात आहेत.