Newsसमाजमाध्यमांवरील विखारी प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी गुगलद्वारे हॅरॅसमेंट मॅनेजर

समाजमाध्यमांवरील विखारी प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी गुगलद्वारे हॅरॅसमेंट मॅनेजर

-

- Advertisment -spot_img

जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी गुगल Google ने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक जीवनातील प्रसिद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी ‘हॅरॅसमेंट मॅनेजर’ नावाचे एक ओपन-सोर्स अँटी-हॅरॅसमेंट टूल सादर केले आहे.

गुगलच्या जिगसॉ युनिटने ओपन-सोर्स अँटी-हॅरॅसमेंट टूलसाठी कोड जारी केला आहे जो सध्या ट्विटरच्या API सह कार्य करू शकतो.  यात ट्विट प्रत्युत्तरे लपवणे आणि खाती म्यूट करणे किंवा ब्लॉक करणे तसेच संदेशांची मोठ्या प्रमाणात चाळणी करून त्याचा अहवाल तयार करणे या सुविधा आहेत.

जिगसॉ ही गुगल मधील एक छोटी शाखा आहे जी खुल्या नागरी समाजाकरिता असलेल्या संभाव्य धोक्यांचा शोध घेते आणि त्या धोक्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान तयार करते. पत्रकार, नागरी समाज किंवा कार्यकर्ते यांना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय जिगसॉ द्वारे शोधले जातात. 

जिगसॉ तर्फे सादर केलेले ‘छळवणूक प्रतिबंध व्यवस्थापक’ हे साधन वापरकर्त्यांना अपमानास्पद संदेशांचा स्वतंत्र अहवाल डाउनलोड करू देईल. गुगल ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ही घोषणा केली आहे. हे साधन विशेषतः ट्विटर वापरणाऱ्या महिला पत्रकारांसाठी म्हणून तयार केले आहे.

कंपनीने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,  “आमची आशा आहे की हे तंत्रज्ञान ऑनलाइन छळाचा सामना करणार्‍या लोकांसाठी, विशेषत: महिला पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी आणि इतर सार्वजनिक व्यक्तिमत्त्वे, ज्यांना विखारीपणाचा ऑनलाइन सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी एक महत्वाचे संसाधन म्हणून उपलब्ध होईल”

आंतरराष्ट्रीय महिला मीडिया फाउंडेशन सारख्या संस्थांनी याचे स्वागत केले आहे. परंतु या नव्या साधनावर  काहीजणांच्या नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत. गुगलचे भाषा विश्लेषण मॉडेल अजून परिपूर्ण नाही. ते कधीकधी व्यंग्यात्मक शब्दांचे चुकीचे वर्गीकरण करते किंवा अपमानास्पद संदेश शोधण्यात अयशस्वी होते. काही लोकांना तर ही एक प्रकारची सेन्सॉरशीप आहे असे वाटते. 

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you