NewsChatGPT चा प्रतिस्पर्धी येणार, Google ने केली $300 दशलक्ष...

ChatGPT चा प्रतिस्पर्धी येणार, Google ने केली $300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

Google has invested $300 million in an AI firm founded by former OpenAI researchers

-

- Advertisment -spot_img

भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील प्रभावासाठी Google आणि Microsoft यांच्यातील स्पर्धा वाढतच चालली आहे. मायक्रोसॉफ्टने ChatGPT या सध्या जगभरातील चर्चेचा विषय असलेल्या अद्भुत ऍप्लिकेशन चे निर्माते ओपनएआयशी संधान साधले असताना, Google ने ओपनएआयच्या माजी कर्मचार्‍यांनी स्थापन केलेल्या परंतु अल्पज्ञात असलेल्या अँथ्रोपिक या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, २०२२ च्या उत्तरार्धात, Google ने सदर स्टार्टअपमध्ये सुमारे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या बदल्यात गुगलला अँथ्रोपिक मध्ये १० टक्के हिस्सा मिळाला आहे.

अँथ्रोपिक देखील Claude नावाने स्वतःचा चॅटबॉट विकसित करत आहे. हा चॅटजीपीटीचा संभाव्य प्रतिस्पर्धी असेल. खरंतर Google कडे आधीपासूनच AI भाषा प्रणाली विकसित करण्यासाठी भरपूर कौशल्य अवगत आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या मते क्लाउड कॉम्प्युटिंग व्यवसायाची उभारणी हे या करारामागील मुख्य कारण असू शकते.

OpenAI ही सुरुवातीला सार्वजनिक हितासाठी काम करणारी कंपनी म्हणून स्थापन केली होती. परंतु नंतरच्या काळात निव्वळ व्यवसायिक लाभ मिळविण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरु झाली त्यामुळे मतभेद निर्माण झाल्यानंतर” OpenAI मधून काही कर्मचारी वेगळे झाले आणि त्यांनी अँथ्रोपिकची स्थापना केली. अँथ्रोपिकने त्यांच्या वेबसाइटवर “विश्वसनीय, व्याख्या करण्यायोग्य आणि स्टीयरबल एआय सिस्टम्स” बनविण्यावर जोर देते असे म्हटले आहे. पण Google च्या गुंतवणुकीमुळे कंपनीच्या या प्राधान्यक्रमांमध्ये बदल होईल का? येत्या ८ फेब्रुवारी रोजी Google त्यांच्या AI मधील पुढील वाटचालीसंदर्भात घोषणा करण्याची अपेक्षा आहे.

Google क्लाउड हे त्यांचे “प्राधान्य क्लाउड प्रदाता” आहे असे अँथ्रोपिकने मागच्या आठवड्यात घोषित केले आहे. Microsoft आणि OpenAI यांच्यातील भागीदारीसुद्धा काहीशी याच स्वरूपाची आहे. मायक्रोसॉफ्टने अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीसोबतच त्यांच्या क्लाउड प्लॅटफॉर्मचे दरवाजे देखील OpenAI साठी खुले केले आहेत.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you