NewsChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचा नवीन चॅटबॉट BARD येणार.

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचा नवीन चॅटबॉट BARD येणार.

Google's new chat bot BARD is coming to compete with ChatGPT.

-

- Advertisment -spot_img

सॅन फ्रान्सिस्को स्थित कंपनी OpenAI ने बनविलेल्या ChatGPT या ऍप्लिकेशनच्या निबंध, कविता किंवा प्रोग्रामिंग कोड लिहिण्याच्या क्षमतेमुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. मानवी लेखन शैलीची हुबेहूब नक्कल करणाऱ्या ChatGPT मध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करणाऱ्या मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गुगलने स्वतःचा बार्ड नावाचा संभाषणात्मक चॅटबॉट जारी करण्याची घोषणा केली आहे.

Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सोमवारी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये Bard हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित संभाषणात्मक Chatbot “येत्या काही आठवड्यात” व्यापकपणे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात ओपनएआय मध्ये आर्थिक गुंतवणूक करत असल्याचे जाहीर करून चॅटजीपीटी ची वैशिष्ट्ये त्यांच्या टीम्स या मिटिंग प्लॅटफॉर्ममध्ये जोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन Bing मध्ये ChatGPT च्या संभाव्य समावेशाने Google चे जागतिक वर्चस्व असलेल्या शोध इंजिनला या नव्या AI समर्थित प्रतिस्पर्ध्याकडून अभूतपूर्व स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते याची जाणीव गुगल ला झाली. अलीकडेच Google ने ओपनएआयच्या माजी कर्मचार्‍यांनी स्थापन केलेल्या अँथ्रोपिक या कंपनीमध्ये सुमारे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या बदल्यात गुगलला अँथ्रोपिक मध्ये १० टक्के हिस्सा मिळाला आहे.

वेबवरून माहिती मिळवून उच्च दर्जाचे प्रतिसाद देण्यासाठी बार्डची रचना केली आहे हे ऍप्लिकेशन लोकांना जटिल विषय समजावून सांगण्यास मदत करू शकते असे पिचाई यांनी स्पष्ट केले. उदा. NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप मधील शोध अगदी ९ वर्षांच्या मुलास समजावू शकते. तसेच जर तुम्हाला सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा काही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी बार्ड मदत करू शकेल.

वापरकर्त्यांना लवकरच Google च्या शोध इंजिनमध्ये AI-शक्तीची वैशिष्ट्ये दिसतील. बार्डला चॅटजीपीटीपेक्षा सरस बनविणारी गोष्ट म्हणजे वेबवरून अद्यावत माहिती घेऊन उच्च-गुणवत्तेचे प्रतिसाद देण्यासाठी BARD सक्षम असेल. सर्वसामान्य वापरकर्त्यांना अधिक व्यापकपणे उपलब्ध होण्यापूर्वी गुगल त्यांच्या विश्वासू चाचणी वापरकर्त्यांना येत्या आठवड्यात BARD वापरण्यास देईल.

फेसबुकची मालक कंपनी मेटा ने सुद्धा गेल्या नोव्हेंबरमध्ये गॅलॅक्टिका नावाचे AI आधारित ऍप्लिकेशन जारी केले होते परंतु त्याचे पक्षपाती आणि चुकीचे परिणाम जेव्हा वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले तेंव्हा कंपनीने ते ऍप्लिकेशन त्वरित मागे घेतले.

गुगलची पालक कंपनी अल्फाबेटने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचा दबाव वाढला होता. कंपनीने गेल्या महिन्यात AI प्रकल्पांवर अधिक जोर देत असल्याचे कारण देत १२००० लोकांना कामावरून काढून टाकत असल्याचे जाहीर केले होते.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you