Newsगुगल क्रोमकास्ट जोडा आणि फक्त ४१९९ रुपयांत तुमच्या साध्या...

गुगल क्रोमकास्ट जोडा आणि फक्त ४१९९ रुपयांत तुमच्या साध्या टीव्हीला एचडी स्मार्ट टीव्ही बनवा

-

- Advertisment -spot_img

तुमच्याकडे जर साधा LED टीव्ही असेल आणि त्यावर स्मार्ट टीव्ही सारखे YouTube, Netflix इत्यादी ऍप्स वरील व्हिडीओ पाहायचे असतील तर Google ने नुकतेच सादर केलेले Chromecast HD उपकरण तुमच्या उपयोगाचे आहे. सामान्य टीव्हीला स्मार्ट बनवण्यासाठी Google ने हे एक स्वस्त उपकरण सादर केले आहे.

गुगल क्रोमकास्ट हे तुमच्या तळहातावर मावेल एवढे लहान उपकरण असून तुमच्या सामान्य टीव्हीच्या HDMI पोर्ट ला जोडले की तुम्ही महागड्या स्मार्टटीव्ही वर ज्या ज्या गोष्टी करू व पाहू शकता ते सर्व तुमच्या सामान्य टीव्हीवर करू शकता. खरंतर Google चे Chromecast हे काही नवे उपकरण नाही. सन २०१३ ला क्रोमकास्टची पहिली आवृत्ती सर्वप्रथम बाजारात सादर केली गेली. यानंतर यात कंपनीने बरेच बदल केले. आता तिसऱ्या पिढीचे क्रोमकास्ट उपकरण 4K व HD दृष्यक्षमते सह सादर केले आहे. 

Chromecast HD चे हे नवीन उपकरण 1080 पिक्सेल व्हिडिओ स्ट्रीमिंगला सहाय्य करते. याची सध्याची किंमत फक्त ४१९९ रुपये आहे. ही किंमत फक्त प्रारंभिक काळापुरती मर्यादित असून नंतर या डिव्हाइसची किंमत ४४९९ रुपये इतकी असेल.

आधीच्या क्रोमकास्ट उपकरणाद्वारे व्हिडीओ पाहताना स्मार्टफोनचा वापर करावा लागत असे. परंतु आता मात्र या नव्या आवृत्तींसोबत Google ने वेगळा रिमोट दिला आहे. 

Chromecast with Google TV (HD) ची वैशिष्ट्ये :

Google TV (HD) सह Google Chromecast 1080p रिझोल्यूशन आणि HDR समर्थित येते. सोबत पांढऱ्या रंगाचे रिमोट उपलब्ध आहे . हे उपकरण  नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस, यूट्यूब, ऍपल टीव्ही प्लस आणि यासारख्या अनेक व्हिडीओ स्ट्रीमिंग ऍप्स पाहण्यास सक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही थेट गुगल प्ले स्टोअरवरून ऍप्स आणि गेम्स डाउनलोड करू शकता. 8GB साठवण क्षमता असणारे हे उपकरण गुगल असिस्टंट सेवेलाही सक्षम करणारे आहे.

यासोबत येणारा व्हॉइस रिमोट हातात धरण्यास आरामदायक आणि वापरण्यास सोपा आहे. यात YouTube, नेटफ्लिक्स व Google Assistant साठी स्वतंत्र बटण आहेत जी वापरकर्त्यांना टीव्हीवर त्यांच्या आवडीचे व्हिडीओ शोधण्यास मदत करू शकते.  गुगल असिस्टंट सेवा तुमच्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.  जसे की, आज हवामान काय आहे? अमुक क्रमांकाच्या ट्रेनची वेळ काय आहे? इत्यादी. 

Google TV वर आता नेटफ्लिक्स व ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ प्रमाणे वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करू शकतात. तसेच लहान मुलांसाठी वेगळे प्रोफाईल बनवू शकतात. यामुळे प्रत्येकाच्या आवडी व वयानुसार पहाण्यायोग्य सामग्री सुचवली जाते. 

तुमच्याकडे जर गुगल होम मिनी स्पीकर असेल तर क्रोमकास्टच्या द्वारे तुम्ही त्यावर गाणी वाजवू शकता. Android आणि iOS फोनच्या दृश्यपटलावरील सामग्री थेट टीव्हीवर स्क्रीन मिररिंग द्वारे पाहता येणे शक्य आहे. हे उपकरण डॉल्बी डिजिटल आणि डॉल्बी अॅटमॉसला सक्षम आहे. यात USB Type-C पोर्ट आहे. क्रोमकास्ट एचडी HDMI पोर्ट, पॉवर अडॅप्टर, रिमोट आणि AAA अल्कलाइन बॅटरीसह येते.

Google TV सह Chromecast च्या HD उपकरणाची किंमत 4K आवृत्तीपेक्षा २२०० रुपयांनी कमी आहे. Google TV (4K) सह Google Chromecast ची किंमत भारतात ६३९९ रुपये आहे. 

तुम्हाला नवीन HD Chromecast विकत घ्यायचे असल्यास ते फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये फक्त  ४१९९ रुपयांना उपलब्ध असेल.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you