Newsअँड्रॉइड फोनवर आता मागील १५ मिनिटांचा शोध इतिहास हटवता...

अँड्रॉइड फोनवर आता मागील १५ मिनिटांचा शोध इतिहास हटवता येणार

-

- Advertisment -spot_img

तुमचा मोबाईल फोन ही तुमची खाजगी बाब आहे परंतु अनेकदा घरातील लहान मुलं किंवा अन्य कुटुंबीय व मित्र मंडळी तुमचा फोन थोड्या वेळासाठी वापरतात. फोनमधील काही अ‍ॅपना पासवर्ड लावून ते अन्य व्यक्तींप्सून सुरक्षित ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र गुगल सर्च मधील इतिहास ज्याला सर्च हिस्टरी असे संबोधले जाते ती माहिती फोन हाताळणारी व्यक्ती सहज पाहू शकते. 

आतापर्यंत Google तर्फे तुमच्या शोध इतिहासाची माहिती स्वयंचलितपणे हटवण्यासाठी ३, १८ किंवा ३६ महिन्यांच्या कालावधीचा पर्याय दिला जात होता. तसेच तुम्ही स्वतःहून मागील १ दिवस किंवा तारखेप्रमाणे निवडलेल्या विशिष्ट कालावधीची सर्च हिस्टरी डिलिट करू शकता. परंतु आता तुमच्या अँड्रॉइड फोनमधील गुगल सर्च इंजिनवरील मागील १५ मिनिटांचा शोध इतिहास सुद्धा स्वयंचलितपणे हटवता येणार आहे. 

Google चे प्रवक्ते Ned Adriance यांनी द व्हर्ज या संकेतस्थळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सध्या Android साठी Google अ‍ॅपवर हे वैशिष्ट्य आणत आहोत आणि येत्या काही आठवड्यांत ते अ‍ॅप वापरणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध होईल अशी आशा करतो.”

मागील १५ मिनिटांचा शोध इतिहास हटविण्याचे वैशिष्ट्य कसे वापरावे?

हे नवीन फिचर वापरण्यासाठी Android वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर Google अ‍ॅप उघडावे लागेल आणि स्क्रीनच्या वरील बाजूच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल चित्रावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘शोध इतिहास’ पाहण्याच्या पर्यायाच्या खाली ‘शेवटची 15 मिनिटे हटवा’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर टिचकी मारून  वापरकर्ते त्यांच्या Google अ‍ॅप वरील शेवटच्या १५ मिनिटांचा शोध इतिहास हटवू शकतील.

सध्या ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांना ते लगेचच त्यांच्या मोबाईलवर दिसणार नाही. २२ मार्च २०२२ रोजी ऑन मराठी च्या टीम ने हे वैशिष्ट्य भारतातील काही अँड्रॉइड फोनवर तपासले असता आढळले नाही. 

खरंतर अँड्रॉइड ही गुगलची स्वतःची मोबाईल संचलन प्रणाली असली तरीही त्यावर येण्यासाठी या वैशिष्ट्याला थोडा वेळ लागला आहे. कारण Google ने त्यांच्या मे २०२१ मधील Google I/O या वार्षिक कार्यक्रमात हे वैशिष्ट्य घोषित केले आणि जुलैमध्ये Google च्या iOS अ‍ॅपवर आणले गेले. शोध परिणाम हटविण्याचे हे वैशिष्ट्य डेस्कटॉपवर आणण्याची सध्यातरी गुगलची योजना दिसत नाही. 

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you