Learningसंगणक व मोबाईलवर मराठी टायपिंग कसे करायचे?

संगणक व मोबाईलवर मराठी टायपिंग कसे करायचे?

How to type in Marathi online using google tools

-

- Advertisment -spot_img

आजच्या या लेखात आपण संगणक व मोबाईलवर ऑनलाईन व ऑफलाईन असताना मराठी मध्ये टंकन म्हणजेच टायपिंग कसे करावे हे शिकणार आहोत. 

ऑनलाईन मराठी टायपिंग (Online Marathi Typing)

संगणकावर मराठी टायपिंग करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल इनपुट टूल्स वापरणे हा आहे. क्रोम वा अन्य कोणत्याही वेब ब्राउझर मध्ये https://www.google.com/intl/mr/inputtools/try/ हे संकेतस्थळ उघडून दिलेल्या चौकटीत तुम्ही थेट मराठीमध्ये टंकन करू शकता. यासाठी तुमच्या संगणकात कोणतेही वेगळे सॉफ्टवेअर स्थापित करावे लागत नाही. तसेच सेटिंग्स मध्येही कोणताच बदल करावा लागत नाही. याचा डिफॉल्ट कीबोर्ड फोनेटिक आहे. म्हणजे तुम्ही जसा उच्चार करता तसे इंग्लिशमध्ये टाईप केल्यावर मराठी शब्द उमटतात. उदा. आकाश व पृथ्वी हे शब्द टाईप करण्यासाठी तुम्हाला aakash व pruthvi असे इंग्लिशमध्ये टाईप करावे लागेल. इंग्लिश मध्ये टाईप केलेले आकडे आपोआप देवनागरी अंकात टंकित होतात. चिन्ह अथवा विशेष वर्ण टाईप करण्यासाठी चौकटी शेजारी बटन दिले आहे. 

गुगलच्या या ऑनलाईन सेवेवर टंकित केलेला मजकूर कॉपी करून हव्या त्या ठिकाणी पेस्ट करू शकता. परंतु थेट एखाद्या संकेतस्थळावरच मराठी टंकन करायचे असल्यास खालील उपाय करावा लागेल.

ऑफलाईन मराठी टायपिंग (Offline Marathi Typing)

इंटरनेट जोडणी चालू नसताना सुद्धा तुम्ही संगणकावर मराठीमध्ये टायपिंग करू शकता. 

विंडोज इनपुट टूल्स वापरून मराठी टायपिंग कसे करायचे?

तुम्ही जर विंडोज प्रणाली वापरत असाल तर सेटिंग्ज मध्ये जाऊन Time & Language या पर्यायावर टिचकी मारून Input language मराठी जोडू शकता. इथेच तुम्हाला तुमचा कीबोर्ड कोणत्या पद्धतीचा हवा ते निवडू शकता. यानंतर तुमच्या स्क्रीन वरील टास्कबार वर जिथे तारीख व वेळ दर्शविली जाते त्याच्या शेजारी भाषा निवडण्याचा पर्याय दिसू लागेल. जेंव्हा मराठी टायपिंग करायचे असेल तेंव्हा MAR निवडा आणि जेंव्हा इंग्लिशमध्ये टंकन करायचे असेल तेंव्हा ENG वर टिचकी मारा. 

गुगल इनपुट टूल्स वापरून मराठी टायपिंग कसे करायचे?

पूर्वी गुगल संगणकावर स्थापित करण्यासाठी इनपुट टूल डाउनलोड करू देत होते. परंतु मागील काही वर्षांपासून त्यांनी ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी गुगलने त्यांच्या अन्य सेवांसाठी हे साधन उपलब्ध करून दिले आहे. क्रोम ब्राऊझरवर एक्सटेंशन च्या स्वरूपात गुगलचे इनपुट टूल स्थापित करून तुम्ही फक्त गुगलच नव्हे तर कोणत्याही वेबसाईटवर मराठी मध्ये टायपिंग करू शकता. 

१. तुमच्या क्रोम वेब ब्राउझर वर Google इनपुट टूल्स चे एक्स्टेंशन स्थापित करण्यासाठी या लिंकला भेट देऊन “Add to Chrome” बटणावर क्लिक करा. तुम्हाला एक पॉपअप विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला “Add Extension” निवडावे लागेल.

२. इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अॅड्रेस बारच्या उजव्या बाजूला Google इनपुट टूल्सचे क्रोम एक्सटेंशन दिसू लागेल. दिसत नसल्यास तुम्हाला क्रोम एक्सटेंशन च्या चिन्हावर क्लिक करून ते पिन करावे लागेल.

३. आता, तुम्हाला त्यात मराठी भाषा जोडण्यासाठी Google इनपुट टूल्सच्या एक्सटेंशन वर क्लिक करून आणि “Extension Options” वर टिचकी मारावी लागेल. 

४. तुम्हाला “Add Input Tools बॉक्समध्ये भाषांची सूची दिसेल. त्यात मराठी भाषा निवडून “Arrow” बटणावर क्लिक करा.

५. Google इनपुट टूल्स एक्स्टेंशनमध्ये जेश्चर व टायपिंग असे दोन मोड आहेत. जेश्चर मोड चालू करण्यासाठी तुम्हाला पेन्सिल चिन्ह निवडावे लागेल. टायपिंग मोड सक्षम करण्यासाठी, तुम्हाला संबंधित भाषेच्या अक्षर चिन्हावर क्लिक करावे लागेल.

आता तुमचा क्रोम ब्राउझर मराठी टायपिंग करण्यास सक्षम झाला आहे. कोणतीही वेबसाईट उघडून त्यावर मराठी मध्ये टायपिंग करण्यासाठी ऍड्रेस बार च्या उजव्या बाजूकडील ‘म’ या चिन्हावर टिचकी मारून मराठी टायपिंग करण्यास सुरुवात करा. इंग्लिश टाईप करायचे असल्यास पुन्हा ‘म’ या चिन्हावर टिचकी मारून बंद करा. 

मोबाईलवर मराठी मध्ये कसे टाईप करायचे

अँड्रॉइड फोनवर कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये कीबोर्ड उघडून स्पेस बार दाबून ठेवा. आता एक नवे पटल उघडेल. त्यात तळाशी Language Settings वर टिचकी मारा. Add Keyboard चा पर्याय दिसू लागेल त्यावर टिचकी मारून मराठी भाषा निवडा. आता फोनेटिक, इनस्क्रिप्ट व जेश्चर रायटिंग असे तीन प्रकारचे कीबोर्ड दिसतील त्यातील तुमच्या सोयीचा कीबोर्ड निवडा. Done बटनावर टिचकी मारून बाहेर पडा. कोणत्याही ऍप्लिकेशनमध्ये टंकन करण्यासाठी स्पेसबार दाबून भाषा निवडा. 

गुगलच्या या अंतर्गत कळफलका शिवाय मराठीमध्ये टंकन करण्यासाठी अनेक ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. डाउनलोड करण्याआधी वापरकर्त्यांचे अनुभव नक्की वाचा. 

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you