Learningअँड्रॉइड फोन मधील जागा मोकळी करण्याचे ६ उपाय

अँड्रॉइड फोन मधील जागा मोकळी करण्याचे ६ उपाय

-

- Advertisment -spot_img

स्मार्टफोन वापरताना नेहमी जाणवणारी समस्या म्हणजे अपुरी पडणारी जागा. तुम्ही कितीही जास्त स्पेस असलेला मोबाईल फोन घ्या पण कधी ना कधी या समस्येला तुम्हाला सामोरे जावेच लागते. या अपुऱ्या पडणाऱ्या जागेच्या समस्येवर काही उपाय आम्ही सुचवीत आहोत त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधील जागा मोकळी ठेवू शकता.

सर्व प्रथम तुमच्या फोनमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा आहे याची माहिती घ्या. म्हणजे कोणत्या फाईल्स हलवायच्या किंवा हटवायच्या याचा निर्णय घेता येईल. यासाठी तुम्हाला फोनमधील सेटिंग्ज मध्ये जाऊन स्टोरेज तपासावे लागेल. काही फोनमध्ये तुमच्या डेटाची छायाचित्र, ध्वनी, चित्रफिती, अ‍ॅप, इत्यादी प्रकारे वर्गवारी करून दाखवली जाते. हे विश्लेषण पाहिल्यावर आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारच्या फाइल्समुळे जागा व्यापलीय ते लक्षात येत.

१. फाईल्स बाय गुगल इन्स्टॉल करा
व्हाट्सएपच्या वापरामुळे फोनमधील जागा भरण्याचे प्रमाण वाढलंय. शुभ सकाळ, दुपार व रात्र आणि वेगवेगळ्या फॉरवर्डेड मेसेजेसमुळे मोबाईलमधील जागा कधी भरते ते कळत सुद्धा नाही. बरं असे संदेश वेळीच हटविण्याचे राहून गेल्यावर नंतर हवे ते मेसेज ठेवणे आणि नको ते डिलीट करणे हे कठीण काम होत. या समस्येवर एक चांगला उपाय आहे तो म्हणजे गुगल चे Files By Google हे अ‍ॅप इंस्टॉल करणे. हे अ‍ॅप तुमच्या फोनमधील डेटाचे त्वरित विश्लेषण करून देते. एव्हढंच नाही तर तुमच्या व्हाट्सअप संदेशांची सुद्धा वर्गवारी करून देते. शुभ सकाळ, मिम्स, फॉरवर्डेड मेसेज, चित्र, व्हिडीओ याची स्वयंचलितपणे वर्गवारी केली जाते. त्यामुळे असे मेसेजेस डिलीट करणे सोपे जाते. या अ‍ॅपमध्ये फोनमधील महाप्रचंड आकाराच्या फाईल्स, डुप्लिकेट फाईल्स दीर्घकाळ न वापरलेली अ‍ॅप यांची यादीसुद्धा दाखवली जाते. थोडक्यात फोनची साफसफाई करण्यासाठी हे अ‍ॅप खूपच उपयोगी आहे.

२. गुगल फोटोज चा वापर करा
फोनमध्ये जागा भरण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे फोटो व व्हिडीओ ची वाढती संख्या. अधिकाधिक मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यांमुळे छायाचित्रांची फाईल साईझ सुद्धा केबी वरून एमबी पर्यंत गेली आहे. जवळपास सर्वच अँड्रॉइड फोनमध्ये हे अ‍ॅप आधीच स्थापित असते परंतु नसल्यास आपण ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. तुमचे गुगल खाते या अ‍ॅपला जोडले की कॅमेऱ्याने काढलेल्या सर्व छायाचित्रांचा बॅकअप आपोआप घेतला जातो. ही छायाचित्रे तुमच्या गुगल खात्यातील जागेमध्ये साठवली जातात. छायाचित्रे गुगलच्या सर्व्हरवर अपलोड होत असल्यामुळे एकदा का बॅकअप झाला की फोनमधील फोटो डिलीट करून जागा मोकळी करता येते. गुगल फोटो कसे वापरावे यासाठी ही विस्तृत पोस्ट वाचा.

३. गुगल ड्राइव्हवर फाईल्स साठवा
अँड्रॉइड फोनमध्ये असणारे गुगल ड्राइव्ह हे अ‍ॅप फोनमधील पीडीएफ, वर्ड फाईल्स, इत्यादी प्रकारचा डेटा साठवून ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. यात विविध फोल्डर्स तयार करून त्यात वेगवेगळ्या फाईल्स साठवता येतात. त्यामुळे फोनमधील जागा मोकळी होण्यास मदत होते. ड्राईव्हचा उपयोग तुम्हाला पीडीएफ व वर्ड फाईल्स पाहण्यासाठी सुद्धा करता येतो. गुगल ड्राईव्हचा प्रभावी उपयोग कसा करता येईल याच्या माहितीसाठी ही पोस्ट वाचा.

४. युट्युबवर खाजगी व्हिडीओ ठेवता येतात
छायाचित्रांप्रमाणेच चित्रफितींमुळे सुद्धा फोनमधील जागा लवकर भरली जाते. आयुष्यातील महत्वाचे क्षण चित्रफितींच्या रूपाने जपून नंतर त्या आठवणी पुन्हा पुन्हा पाहता येतात. व्हिडिओंची साईज ही फोटोंपेक्षाही खूप मोठी असल्याने फोनमधील स्पेस लगेच भरते. यूट्यूबची ओळख ही तशी व्हिडीओ सार्वजनिक करण्याची जागा म्हणून आहे. परंतु बऱ्याच जणांना कल्पना नसते की युट्युबवर खाजगी स्वरूपातही व्हिडीओ साठवता येतात. असे खाजगी व्हिडीओ तुम्ही मोजक्या लोकांसोबत खाजगीपणे शेअर सुद्धा करू शकता. महत्त्वाचं म्हणजे युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओ तुमच्या गुगल खात्याच्या जागेमध्ये मोजले जात नाही.

५. अनावश्यक अ‍ॅप व अ‍ॅप डेटा हटवा
अनेकदा काही अ‍ॅप ही आपण तात्पुरत्या स्वरूपात डाउनलोड केलेली असतात. तात्पुरते काम झाले की याचा वापरही होत नाही. गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन Manage my Apps वर टिचकी मारा. इथे Manage टॅब मध्ये तीन रेषांच्या मेनूवर टिचकी मारून sort by least used निवडा. आता तुम्ही कमी वापर असलेली अ‍ॅप पाहू शकता. यातील नको ती अ‍ॅप निवडून डिलीट करून जागा मोकळी करू शकता. तसेच काही अ‍ॅप चा cache डेटा डिलीट करा.

६. अन्य अनावश्यक फाईल्स हटवा
तुमच्या फोनमधील डाउनलोड फोल्डर हे अनावश्यक फाईल्सचे भांडार असते. याच फोल्डरमध्ये डाउनलोड केलेल्या फाईल्स आपोआप येऊन साठतात. महिन्यातून किमान एकदा हे गोल्डर चाळून यातील अनावश्यक फाईल्स हटवा आणि ज्या आवश्यक असतील त्या गुगल ड्राइव्ह वर किंवा अन्य ठिकाणी सेव्ह करा. तुम्ही जर सर्व कॉल साठी रेकॉर्डिंग चालू ठेवले असेल तर या ध्वनी फाईल्स वरचेवर साफ करत जा.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you