Healthस्मार्टफोनच्या अति वापरामुळे हैदराबादच्या महिलेची दृष्टी गेली, डॉक्टरांचे...

स्मार्टफोनच्या अति वापरामुळे हैदराबादच्या महिलेची दृष्टी गेली, डॉक्टरांचे ट्विट व्हायरल!

Hyderabad woman lost her vision due to excessive use of smartphone

-

- Advertisment -spot_img

तंत्रज्ञानाच्या व्यसनाचे नकारात्मक परिणाम मानवाच्या आता लक्षात आले आहेत, परंतु अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हैदराबादमधील एका महिलेने अलीकडेच तिच्या स्मार्टफोनच्या सवयीचे भयानक परिणाम अनुभवले. मोबाईलच्या अति वापरामुळे काही काळापुरती तिला दृष्टी गमवावी लागली होती. हैदराबादचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी ट्विटरवर त्यांच्या मंजू नावाच्या 30 वर्षीय रुग्णाची कहाणी शेअर केली. ती त्यांच्याकडे आली तेंव्हा तिच्यामध्ये फ्लोटर्स, प्रकाशाची तीव्र चमक आणि गडद झिगझॅग पॅटर्न अशी लक्षणे आढळली. तपासणी करता तिचे स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम (SVS) चे निदान झाले. सदर महिला एका वर्षाहून अधिक काळ दररोज रात्रीच्या अंधारात तासन तास फोन वापरत होती, तिची हीच सवय तिच्या दृष्टीच्या समस्येचे मूळ कारण होते.

मंजूने तिच्या दिव्यांग मुलाची काळजी घेण्यासाठी ब्युटीशियनची नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यांनी तिला ही लक्षणे दिसू लागली. घरीच असल्याने तिचा बराच वेळ स्मार्टफोन वापरण्यात जाऊ लागला. रात्री अंधार करून उशिरापर्यंत फोन पाहण्याच्या सवयीमुळे डोळ्यांवर ताण येऊ लागला. त्यामुळे अनेकदा ती जेंव्हा रात्रीच्या वेळी शौचालयास जाण्यास उठायची तेंव्हा तिला कित्येक सेकंद काहीही दिसत नव्हते.

डॉ. सुधीर यांनी मंजूला तिचा स्क्रीन टाइम अतिशय कमी करण्याचा सल्ला दिला आणि एका महिन्यानंतर तिची दृष्टी पूर्णपणे बरी झाली. जे डिजिटल उपकरणांवर जास्त वेळ घालवतात त्यांच्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. कारण यामुळे अंधत्वासह गंभीर दृष्टी-संबंधित समस्या उद्भवू शकतात. मंजूच्या प्रकरणात वेळेत उपचार केले गेले, परंतु अनेक लोक स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल व्हिजन सिंड्रोमच्या इतर प्रकारांनी ग्रस्त आहेत याचे त्यांना भान नाही. या परिस्थितींमुळे दृष्टी आंशिक किंवा पूर्ण नष्ट होऊ शकते. यावर उपचारांसाठी जीवनशैली आणि औषधांमध्ये बदल आवश्यक आहेत. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांचा जबाबदारीने वापर आवश्यक आहे. या समस्या टाळण्यासाठी डॉ. सुधीर यांनी 20-20-20 नियमाचे पालन करण्यास सुचविले आहे. डिजिटल स्क्रीन वापरताना दर २० मिनिटांनंतर २० सेकंदाचा ब्रेक घेऊन २० फूट दूर असलेल्या गोष्टीकडे पहा.

हे प्रकरण आपल्या दैनंदिन दिनचर्येचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो यावर प्रकाश टाकतो. तंत्रज्ञान आणि स्मार्ट उपकरणांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता असूनही, बरेच लोक सावधगिरींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या व्यसनामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, डिजिटल उपकरणे जबाबदारीने वापरणे आणि आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

SourceTwitter

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you