Financeआरबीआयचा पेटीएम ला दणका. पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास...

आरबीआयचा पेटीएम ला दणका. पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध

-

- Advertisment -spot_img

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज जरी केलेल्या आदेशाप्रमाणे पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहकांना जोडण्यापासून प्रतिबंधित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने होणार आहे. आरबीआयने मात्र याबाबत कोणताही तपशील दिलेला नाही. परंतु नियमांच्या अनुपालना संबंधी त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. आरबीआय च्या संकेतस्थळावर या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35अ अंतर्गत ही कडक कारवाई करण्यात आली आहे. कलम 35A नुसार भारताची नियामक बँक ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा कोणत्याही व्यवहारास स्थगिती देऊ शकते. 

आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पेटीएम पेमेंट्स बँकेला तिच्या आयटी प्रणालीचे सर्वसमावेशक ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर, नवीन ग्राहकांची नोंदणी बँकिंग नियामकाच्या विशिष्ट परवानगींच्या अधीन असेल. पेटीएम पेमेंट्स बँकेला मे २०१७ मध्ये बँकिंग परवाना मिळाला होता. पेमेंट बँक आपल्या ग्राहकांकडून ठेवी गोळा करू शकते. तथापि, तिच्या ताळेबंदातून ती ग्राहकांना  कोणतेही कर्ज देऊ शकत नाही.

आर्थिक विषयांतील नियतकालिकांच्या वृत्तानुसार RBI ने नुकत्याच केलेल्या पर्यवेक्षी परीक्षणामध्ये ग्राहकांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत मोठ्या प्रमाणात निष्क्रिय खाती आढळून आली, जी ठेवीदारांची पुरेशी केवायसी प्रक्रिया पार न पाडता उघडण्यात आली. यावर नियामक बँकेने पेमेंट बँकेकडे चौकशी केली होती. पेमेंट्स बँकेने आरबीआय च्या चौकशीस उत्तर सुद्धा दिले होते असे कळते. तथापि, असे दिसते की पेटीएम पेमेंट्स बँकेकडून मिळालेल्या प्रतिसादांवर नियामक बँक समाधानी नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून या कठोर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. 

PayTM आणि One97 Communications Limited चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय शेखर शर्मा यांची मिळून पेटीएम पेमेंट्स बँक आहे. शर्मा हे पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, PayTM पेमेंट्स बँकेची सहयोगी संस्था पेटीएम ने घोषणा केली होती की तिला शेड्यूल्ड पेमेंट बँक म्हणून व्यवहार करण्यासाठी बँकिंग नियामकाची मान्यता मिळाली आहे. यामुळे बँकेला आर्थिक सेवा व्यवहारांचा विस्तार करण्यास मदत झाली आहे. या घोषणेनंतर, पेटीएमच्या शेअर किंमतीमध्ये थोडी वाढ पहावयास मिळाली होती. ३१ मार्च २०२१ पर्यंत पेटीएम पेमेंट्स बँकेत ६४ दशलक्ष बचत खाती होती आणि ५२०० कोटींहून अधिक ठेवी होत्या. 

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you