Businessसचिन बन्सल यांची नवी टेक्नॉलॉजीज IPO द्वारे ३३५० कोटी...

सचिन बन्सल यांची नवी टेक्नॉलॉजीज IPO द्वारे ३३५० कोटी रुपयांचा निधी उभारणार. 

-

- Advertisment -spot_img

फ्लिपकार्ट या सुप्रसिद्ध इ कॉमर्स कंपनीचे आद्य संस्थापक सचिन बन्सल यांचे नवे स्टार्टअप नवी टेक्नॉलॉजीज ने रोखे बाजाराची नियंत्रक सेबी कडे प्रारंभिक भाग विक्री (IPO) द्वारे ३३५० कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. या DRHP कागदपत्रांनुसार कंपनी जूनमध्ये आपला IPO बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. 

हा प्रस्तावित IPO पूर्णपणे इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्यूद्वारे होणार आहे यात ऑफर फॉर सेल पद्धतीचे रोखे नसतील. याचा अर्थ सचिन बन्सल कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी करणार नाहीत. सध्या नवीमध्ये त्यांचा ९७% हिस्सा आहे. 

बन्सल यांनी २००७ मध्ये फ्लिपकार्ट ही ऑनलाईन मार्केटप्लेस कंपनी सुरु केली होती. वर्ष २०१८ मध्ये रिटेल व्यवसायातील महाकाय अमेरिकन कंपनी वॉलमार्ट सोबतच्या करारा नंतर ते कंपनीमधून बाहेर पडले. त्याच वर्षी त्यांनी अंकित अगरवाल यांच्यासोबत नवी टेक्नॉलॉजीज ही आर्थिक उत्पादन विक्रीची स्टार्टअप कंपनी स्थापन केली. त्यांच्या व्यतिरिक्त, नवीमध्ये एचडीएफसी बँकेचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक परेश सुखटणकर यांचे व एका बेंगळुरू स्थित कंपनीचे भागभांडवल आहे. 

नवी ने स्वतःच्या म्युच्युअल फंड व्यवसायाव्यतिरिक्त वैयक्तिक कर्ज आणि मायक्रोफायनान्सिंग व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. रोखे विक्रीतून मिळणारे पैसे कंपनीच्या आक्रमक विकास योजनांना निधी देण्यासाठी वापरले जातील. नवी कडे सुमारे तीस दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत आणि त्यांनी फेब्रुवारीमध्ये ५०० कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जे वितरित केली आहेत. सध्या नवी समुहामध्ये वैयक्तिक आणि गृह कर्ज प्लॅटफॉर्म नवी फिनसर्व्ह, म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म, नवी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, आरोग्य विमा वर्टिकल,  नवी जनरल इन्शुरन्स आणि सूक्ष्म कर्ज देणारी संस्था चैतन्य मायक्रो फायनान्स या उपकंपन्यांचा समावेश आहे. २०२० च्या सुरूवातीस, चैतन्य मायक्रो फायनान्सने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून युनिव्हर्सल बँक परवान्यासाठी अर्ज केला होता परंतु त्यांना अद्याप परवाना मिळू शकलेला नाही.

नवीने नुकतेच त्यांच्या संचालक मंडळावर व्हॉट्सॲप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस; गुंतवणूकदार आणि पेपरबोटचे बोर्ड सदस्य श्रीपाद नाडकर्णी तसेच माजी PwC भागीदार उषा नारायणन यांची नियुक्ती केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर आनंद सिन्हा हे स्वतंत्र संचालक म्हणून आधीच संचालक मंडळावर आहेत.

नवीचे सध्याचे कर्ज वाटप सुमारे ३६०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. यामध्ये गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सूक्ष्म कर्जाचा समावेश आहे. Navi Technologies आर्थिक वर्ष २०२० (FY21) मध्ये नफ्यात होती. तिने ७१ कोटी रुपयांचा एकत्रित नफा नोंदवला. कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे कारण FY21 मध्ये महसूल सुमारे ७८० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो FY20 मध्ये २२१ कोटी होता. 

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you