Businessरिलायन्स जिओ लवकरच उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देणार

रिलायन्स जिओ लवकरच उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देणार

-

- Advertisment -spot_img

भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनी Jio Platforms ने जर्मन उपग्रह प्रदाता SES सोबत Jio Space Technology नावाचा एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. याचा उद्देश भारतात उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून परवडणारी ब्रॉडबँड सेवा वितरीत करण्याचा आहे. या संयुक्त उपक्रमाच्या अटींनुसार, जिओ कडे अनुक्रमे ५१% आणि SES ची ४९% भागीदारी असेल.

SES च्या उपग्रहांचा पृथ्वीच्या भूस्थिर आणि मध्यम या दोन्ही कक्षांमध्ये वापर करून १०० Gbps पर्यंतच्या क्षमतेने संपूर्ण भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा दिली जाईल. हा संयुक्त उपक्रम भारतात इंटरनेट गेटवे पायाभूत सुविधा देखील विकसित करेल. या संयुक्त व्यवसायामध्ये जिओ या मुख्य कंपनीने Jio Space Technology सोबत सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीचा खरेदी करार केला आहे.

२०१६ मध्ये टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स जिओच्या धमाकेदार प्रवेशाच्या काही वर्षांमध्येच ती देशातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर कंपनी बनली. त्यांच्या विशाल दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये सॅटेलाइट ब्रॉडबँड हाच एकमेव मोठा गहाळ दुवा होता. 

जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी म्हटलंय की फायबर-आधारित कनेक्टिव्हिटी व्यवसायाचा विस्तार आणि 5G तंत्रज्ञानांमध्ये गुंतवणूक करत असताना, SES सोबतचा हा नवीन संयुक्त उपक्रम प्रचंड वेगाच्या ब्रॉडबँड सेवेच्या वाढीला अधिक गती देईल. 

उपग्रहा द्वारे दिल्या जाणाऱ्या ब्रॉडबँड सेवेमुळे दुर्गम गाव व लहान शहरांमधील इंटरनेट आधारित व्यवसाय, उपक्रम, सरकारी आस्थापना आणि वैयक्तिक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेला यामुळे गती मिळेल. जिओचा संपूर्ण भारतातील विस्तार आणि ग्राहक संयोजनाच्या अनुभवाचा उपयोग या नवीन उपक्रमात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक एलन मास्क हे त्यांची कंपनी स्टारलिंक द्वारे भारतात उपग्रह आधारित सेवा देण्यासाठी उत्सुक होते. याकरिता त्यांनी भारतीय ग्राहकांकडून अनामत रकमेच्या स्वरूपात काही पैसे सुद्धा घेतले होते. परंतु केंद्र सरकारने स्टारलिंक कडे दूरसंचार परवाना नसल्याने ग्राहकांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले. भारती एअरटेल ने सुद्धा त्यांच्या वनवेब या कंपनीमार्फत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा देण्याचे सूतोवाच केले आहे.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you