Autoब्रेझा सीएनजी: मारुती सुझुकी तर्फे ९.१४ लाखांत सादर

ब्रेझा सीएनजी: मारुती सुझुकी तर्फे ९.१४ लाखांत सादर

Maruti Suzuki launched Brezza S-CNG version starting at Rs 9.14 lakh

-

- Advertisment -spot_img

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने तिच्या सीएनजी वाहनांच्या मालिकेत अजून एका गाडीची भर टाकली आहे. फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह देशातील पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV लॉन्च केली आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या मालकीच्या S-CNG तंत्रज्ञानासह ब्रेझा सीएनजी Brezza CNG सादर केली आहे.

आत्तापर्यंतच्या सर्व सीएनजी गाड्या तळाच्या व मध्यम श्रेणी मध्येच सादर केल्या गेल्या होत्या. मारुती सुझुकीने पहिल्यांदाच परंपरा मोडत ब्रेझा सीएनजी ZXi या वरच्या श्रेणीमध्ये सुद्धा सादर केली आहे.

नवीन Maruti Brezza CNG ची LXI या खालच्या श्रेणीतील गाडीची किंमत ९. १४ लाख रुपयांपासून सुरू होते. तर VXI या मध्यम श्रेणीतील गाडी 10.5 लाख रुपयांना उपलब्ध होईल. वरच्या श्रेणीतील म्हणजे ZXI प्रकारातील गाडी रु. 11.9 लाख आणि टॉप ऑफ लाइन ZXI CNG ड्युअल टोन रु. 12.05 लाख आहे. सर्व किमती एक्स शोरूम आहेत. सध्या फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहेत.

रंग व रूपाच्या दृष्टीने गाडीच्या आत व बाहेर तसा कोणताही मोठा बदल केलेला नाही. मात्र सीएनजी टाकी सामावून घेण्यासाठी पेट्रोल गाडीच्या तुलनेत बूट स्पेस म्हणजेच सामान ठेवायची जागा थोडी कमी झाली आहे. परंतु हे स्वाभाविक आहे.

नवीन ब्रेझा एस-सीएनजी गाडी मारुतीच्या के-सीरीज 1.5L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनद्वारे समर्थित आहे. या SUV मधील हे इंजिन 5500rpm वर 86.6 bhp चा कमाल पॉवर आउटपुट आणि 4200rpm वर 121.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही गाडी एक किलो सीएनजी इंधनामध्ये २५. ५१ किमी धावते. Brezza S-CNG 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येईल. ही गाडी LXi, VXi आणि ZXi या तीन भिन्न प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

ब्रेझा एस-सीएनजी च्या वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस ऍपल कारप्लेसह स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो, कीलेस पुश स्टार्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे. मारुती सुझुकी एकात्मिक पेट्रोल आणि CNG इंधन झाकण, समर्पित CNG ड्राइव्ह मोड, डिजिटल आणि अॅनालॉग CNG इंधन गेज, इत्यादी उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकीने अलीकडेच ब्रेझामध्ये देखील अपडेट केलेले BS6 फेज-2 अनुरूप इंजिन लाँच केले आहे. ब्रेझा 1.5-लिटर चार-सिलेंडर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. ते जास्तीत जास्त 103 PS पॉवर आणि 136.8 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. ही गाडी 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशनसह उपलब्ध असेल.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव, नवीन ब्रेझा CNG लाँच करताना म्हणाले, “ब्रेझा मारुती सुझुकीसाठी गेम चेंजर ठरली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार मारुती सुझुकी अरेनामध्ये एकूण विक्रीत S-CNG वाहनांचा वाटा २४% वाटा आहे. तर एर्टिगा आणि वॅगनआर सारख्या लोकप्रिय सीएनजी गाड्यांची विक्री एकूण वाहनांच्या विक्रीच्या अनुक्रमे ५७% आणि ४१% इतकी जास्त आहे. शिवाय, देशभरात ज्या गतीने सरकार सीएनजी पंपांचा विस्तार वाढवीत आहे त्यामुळे येत्या काही वर्षांत सीएनजी गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.” Brezza CNG ही मारुती सुझुकीच्या सीएनजी मालिकेतील १४ वी गाडी आहे.

सूचना: वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वैशिष्ट्यांमध्ये तफावत आढळू शकते. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you